CM Eknath Shinde Group
CM Eknath Shinde Group Saam TV
महाराष्ट्र

मंत्रिमंडळातील काही आमदार नंतर आलेत हे खरंय; बच्चू कडूंनंतर आणखी एक आमदार मनातलं बोलला

संजय जाधव, साम टीव्ही

बुलडाणा : राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) मंत्रिमंडळाचा विस्तार तब्बल ४० दिवसांनंतर झाला. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारानंतर एकनाथ शिंदे (Eknath shinde) गटातील अपक्ष आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आणि शिंदे गटातील आमदारांच्या मनातील खदखद बाहेर पडलायला लागल्याच चित्र पहायला मिळालं.

अशातच सर्वाधिक नाराजीची चर्चा झाली ती अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केलेल्या विधानाची, 'मंत्रिमंडळ विस्तारात अपक्षांना स्थान अपेक्षित होत, तर मागून आलेल्यांना मंत्रीपद मिळालं आणि पुढे गेलेल्यांना काहीच मिळालं नाही' असं बच्चू कडू म्हणाले होते. अशातच आता शिंदे गटातील आणखी एका आमदाराने बच्चू कडू यांच्या सुरात सुर मिसळला आहे.

पाहा व्हिडीओ -

मंत्रिमंडळातील काही लोक मागून आलेत हे खरंय हे खरं असल्याचं वक्तव्य आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी केलं आहे. गायकवाड म्हणाले, 'काही लोक मागून आले हे खरं आहे, तसं असलं तरी हा जो विस्तार झाला तो कॅबिनेट मंत्र्यांचा झाला आहे. जास्त आमदार नाराज आहेत असं मला वाटत नाही.

बच्चु कडू यांना अपेक्षा होती, की आपला पहिल्या रांगेत नंबर लागला पाहिजे, परंतु मागच्या काळात ते राज्यमंत्री होते. राज्यमंत्र्यांचा विस्तार अजून बाकी आहे. त्यांनी कॅबिनेटची अपेक्षा व्यक्त केली होती का ? हे मला नाही पण राज्यमंत्र्यांचा विस्तार पुढच्या महिन्यात होणार असल्याचही शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : हेमंत सोरेन यांच्या अटकेविरोधातील याचिकेवर आज सुनावणी

Elon Musk: भारत भेट रद्द केल्यानंतर मस्क पोहोचले चीनमध्ये, भेटीचं कारण काय?

Siddhant Chaturvedi Birthday : बॉलिवूडच्या 'गली बॉय'चा आज वाढदिवस; अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आहे कोट्यवधींचा मालक

Narendra Modi: विरोधकांवर ईडी, सीबीआयची कारवाई सुडबुद्धीने? PM मोदींनी फेटाळला आरोप; नेमकं काय म्हणाले?

Mohan Bhagwat : समाजात जोपर्यंत विषमता आहे, तोपर्यंत आरक्षण असलं पाहिजे : मोहन भागवत

SCROLL FOR NEXT