बारामतीनंतर आणखी एका विमान अपघाताने खळबळ
कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यात प्रशिक्षण विमान कोसळले
इंधन संपणे किंवा तांत्रिक बिघाडाची प्राथमिक शक्यता
दोन वैमानिक जखमी; उपचारानंतर प्रकृती स्थिर
स्थानिक नागरिकांनी दाखवली तत्काळ मदत
विश्वभूषण लिमये, साम टीव्ही
सोलापूर: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची घटना ताजी असतानाच कर्नाटकमधील विजयपूर जिल्ह्यात एक हलके प्रशिक्षण विमान कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वरजवळ असलेल्या मंगळूरू गावाच्या परिसरात हे विमान जमिनीवर कोसळले. प्राथमिक माहितीनुसार इंधन संपणे किंवा तांत्रिक बिघाड हे अपघाताचे संभाव्य कारण मानले जात आहे. या अपघातात सहाय्यक फ्लाइट इन्स्ट्रक्टर कॅप्टन कुणाल मल्होत्रा आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक गौतम संकर हे दोघे जखमी झाले असून, त्यांना अधिक उपचारांसाठी बीएलडीई रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.
वैमानिक प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या रेड बर्ड एव्हिएशन संस्थेचे हे प्रशिक्षण विमान कलबुर्गीहून बेळगावकडे जात असताना अपघातग्रस्त झाले.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीस धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोहोचवले. सध्या दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.