Veteran social activist Anna Hazare saamtv
महाराष्ट्र

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

Veteran social activist Anna Hazare: पुण्यातील एका बॅनरवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिलीय. बॅनर लावून अण्णा हजारे यांच्यावर टीका करण्यात आली होती.

Bharat Jadhav

राज्यात सध्या मतदार यादीतील घोळ आणि निवडणूक आयोगावर विरोधकांकडून गंभीर आरोप होतोय. यातच पुण्यात बॅनर लावत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका करण्यात आलीय. बॅनरवर 'अण्णा, आता तरी उठा अशा आशयाचे मजकूर लिहून त्यांच्यावर पुणेरी शैलीत टीका करण्यात आली होती. या बॅनरवर अण्णा हजारे यांनी मौन सोडलंय. अण्णा हजारे यांनी खंत व्यक्त देशातील तरुणांना सवाल केलाय.

भ्रष्टाचार होऊ नये, भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी मी १० कायदे केलेत. माहितीचा अधिकार देशाला मिळालाय. यातून किती जागृती दिली. दफ्तर दिरंगाई, बदलीचा कायदा, लोकपाल, लोकायुक्त यासारखे १० कायदे आणले गेले. आता ९० व्या वर्षानंतरही अण्णा हजारेंनी हे करतच राहावे. तुम्ही झोपून राहावे, अशी कोणाची अपेक्षा असेल तर हे चुकीचं आहे. अण्णा हजारे यांनी मागच्या काळात जे केले ते तरूणांनी केले पाहिजे असं वाटायला हवं. आपले कर्तव्य आहे की नाही? असा सवाल अण्णा हजारे यांनी तरुणांना विचारलाय.

आपण स्वातंत्र्यदिन साजरा केला. मी देशाचा नागरीक आहे. नुसते हातात तिरंगा घेऊन काही होणार नाहीये. देशासाठी ज्यांनी बलिदान केले त्यांची आठवण ठेवली पाहिजे. फक्त दुसऱ्यांवर बोट दाखवून त्यातून बदल होणार नसून तरुणांनी जागे झाले पाहिजे. मी मोठ्या आशेने तरुणांकडे पाहतोय. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे.

ही तरूणाई जागी झाली तर उद्याचं भविष्य दूर नाही असं मला वाटतं. म्हणून कायदे करून तरूणांच्या हातात दिलेत. आता एवढी वर्ष झाली तरी आजही अण्णा हजारे यांनीच जागे व्हावे, हे ऐकल्यानंतर वाईट वाटतं अशी खतं अण्णा हजारे यांनी व्यक्त केलीय.

दरम्यान भ्रष्टाचार विरोधी चळवळीचा प्रमुख चेहरा म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे पाहिले जातं. भारतात २०१४ साली सत्तांतर होण्यास अण्णा हजारे यांनी केलेले आंदोलन कारणीभूत ठरल्याचं बोलले जातं. अण्णांनी केलेल्या आंदोलनचा मोठा फटका काँग्रेसला बसला होता. आता मत चोरीवरून अण्णा हजारे यांनी काहीच भूमिका घेतली नसल्यानं त्यांच्यावर पुणेरी शैलीत टीका करण्यात आली होती. पुण्यात जागोजागी अण्णा हजारे यांचे बॅनर लावण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी मनिषा हवालदारची जेलमध्ये रवानगी

Rajeev Verma: अमिताभ बच्चन यांचे साडू, प्रसिद्ध अभिनेते अचानक बॉलिवूडपासून झाले दूर; आता चालवतात हॉटेल

एकही केस गळणार नाय! रात्री झोपण्यापूर्वी करा 'हा' 1 सोपा उपाय; केस होतील लांब आणि मजबूत

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा तळतळाट महायुतीला पडेल महागात; वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप

Mumbai Crime: भयानक ! पत्नीला ४ तास 'कोंबडा' बनवून अमानुष मारहाण; तडीपार आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT