Anil Parab targets Ramdas Kadam over 1993 wife death case, demands probe ahead of Maharashtra elections Saam Tv
महाराष्ट्र

Ramdas Kadam: रामदास कदमांची बायको जळली की जाळली? 1993 च्या प्रकरणावरुन कदमांची कोंडी?

Ramdas Kadam vs Anil Parab: 1993 च्या प्रकरणात रामदास कदम अडचणीत येण्याची शक्यता आहे.. कारण अनिल परबांनी रामदास कदमांना चांगलंच घेरलंय... मात्र अनिल परबांनी कदमांची कशी नाकेबंदी केलीय... त्यावर उत्तर देतांना कदमांची कशी तारांबळ झालीय?

Bharat Mohalkar

बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर मृतदेहाचा छळ केल्याच्या आरोप शिंदेसेनेचे नेते रामदास कदमांनी केला आणि या आरोपांनी राज्यात वादळ उठलं. मात्र या आरोपांना उत्तर देतांना अनिल परबांनी थेट 1993 चं प्रकरण उकरुन काढत रामदास कदमांना घेरलंय.. रामदास कदमांची बायको जळाली की जाळली? असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीच अनिल परबांनी केलीय...तर आरोप फेटाळून लावताना परबांना कोर्टात खेचण्याचा इशारा रामदास कदमांनी दिलाय..

एवढंच नाही तर रामदास कदमांनी खुद्द बाळासाहेब ठाकरे जसलोक रुग्णालयात पत्नी ज्योती कदमांना भेटण्यासाठी आल्याचं सांगितलंय.. रामदास कदमांनी 13 वर्षानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाच्या छळाविषयी केलेलं वक्तव्य असो वा 32 वर्षानंतर परबांकडून रामदास कदमांच्या पत्नीच्या अपघाताविषयी केलेलं वक्तव्य असो.. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापणार हे निश्चित...मात्र सरकार अनिल परबांनी केलेल्या आरोपांची चौकशी करुन दूध का दूध आणि पानी का पानी करणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT