sushma andhare, anil khochare saam tv
महाराष्ट्र

Sushma Andhare News : प्रबाेधन यात्रा म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात जिलेबी... शिंदे गटाचा ठाकरेंवर प्रहार

गेल्या वर्षभरात त्यांचं नेमकं काय प्रबोधन झालं ? त्यांनी शिवसेनेसाठी काय योगदान दिलं ?

साम न्यूज नेटवर्क

- कैलास चाैधरी

सुषमा अंधारे (sushma andhare) यांची प्रबोधन यात्रा म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात जिलेबी वाटण्याचा कार्यक्रम असल्याची टीका उस्मानाबाद जिल्ह्यातील शिंदे गटाचे नेते अनिल खोचरे यांनी केली. सुषमा अंधारे यांना शिवसैनिकावर (shivsainik) टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही असा समाचार खोचरे यांनी घेतला आहे.

गेली दोन दिवस सुषमा अंधारे यांची प्रबोधन यात्रा उस्मानाबाद जिल्ह्यात होती. यावेळी आंधरे यांनी शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले व आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यावर टीका केली होती. आज शिंदे गटाच्या वतीने अनिल खोचरे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. (Maharashtra News)

सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. हिंदू देव देवता बद्दल अपमानकारक वक्तव्य केली. गेल्या वर्षभरात त्यांचं नेमकं काय प्रबोधन झालं ? त्यांनी शिवसेनेसाठी काय योगदान दिलं ? असा प्रश्न करत त्यांची प्रबोधन यात्रा म्हणजे दुसऱ्याच्या लग्नात जिलेबी वाटण्याचा कार्यक्रम असल्याची टिप्पणी अनिल खोचरे यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे (uddhav thackeray) गटाचे उस्मानाबाद जिल्हा संपर्कप्रमुख अनिल खोचरे यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. अनिल खोचरे यांचे पक्षांतर हे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातो. खोचरे यांनी शालेय जीवनात वर्गणी गोळा करून बाळासाहेब ठाकरेंची भेट घेत शिवसेनेचे (shivsena) काम सुरू केले होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washington Sundar: कोणाला डेट करतोय वॉशिंग्टन सुंदर? जाणून घ्या कोण आहे ही 'मिस्ट्री गर्ल'

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Pune : पुरुषावर अत्याचार करणाऱ्या महिलेवर आणखी एक गुन्हा, नवरा-बायकोच्या वादात...

Face Serum : नासलेले दूध फेकून देताय? थांबा! हिवाळ्यात बनवा 'असा' फेस सीरम, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो

Railway Jobs: रेल्वेत १,२०,५७९ पदांसाठी भरती; मागच्या ११ वर्षात लाखो पदे भरली; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT