anganwadi sevika andolan at mulshi panchayat samiti saam tv
महाराष्ट्र

Anganwadi Sevika Strike: अंगणवाड्यांना टाळं, सेविकांचे मुळशी पंचायत समितीवर साखळी आंदोलन

मुळशी तालुक्यातील 350 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आंदोलन पुकारले आहे.

दिलीप कांबळे

Maval News :

विविध मागण्यांच्या पू्र्ततेसाठी मुळशी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी (Anganwadi Sevika) मुळशी पंचायत समिती कार्यालयासमोर साखळी आंदाेलन सुरु केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मुळशी तालुक्यातील एकही आंगणवाडी सुरू करू देणार नाही, अशी भूमिका अंगणवाडी सेविकांनी घेतली आहे. (Maharashtra News)

शासनाने अंगणवाडी सेविकांना ग्राजुटी दयावी व मानधन न देता सरकारी वेतनसहित पेंशन योजना लागू करावी. वीस हजार मदतनीस तर 26 हजार सेविकांना मानधन मिळाले पाहिजे या प्रमुख मागणीसाठी मुळशी तालुक्यातील 350 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आंदोलन पुकारले आहे.

मुळशी तालुक्यातील बहुतांशी अंगणवाड्या बंद ठेवून या अंगणवाडी सेविकेंनी शिंदे सरकारच्या नावाने मुळशी पंचायत कार्यालयासमोर बोंबा बोंब आंदोलन केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार रुपये, तर मदतनीसांना वीस हजार रुपयांचे वेतन द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मुळशी तालुक्यातील एकही आंगणवाडी सुरू करू देणार नाही, अशी भूमिका यावेळी घेण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT