andhera police booked one pretending as buldhana collector saam tv
महाराष्ट्र

Buldhana Crime News : लाखो रुपयांसह तोतया जिल्हाधिकारी पसार, तहसीलदारांची पाेलिसांत तक्रार

काही वेळानंतर रेतीमाफी यांना हा तोतया असल्याची माहिती मिळली.

संजय जाधव

Buldhana News :

बुलढाण्यात एकाने जिल्हाधिकारी असल्याचे सांगत रेती वाहतुकदारांकडून लाखो रुपयांची रक्कम उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आले. या प्रकरणी तोतया जिल्हाधिकारी याच्या विराेधात तहसीलदार यांच्या तक्रारीनंतर अंढेरा पोलिस ठाण्यात (andera police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra News)

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील समृद्धी महामार्गाच्या (samruddhi mahamarh) लगत असोला जहांगीर परिसरात रात्रीच्या वेळी एका व्यक्तीने बुलढाणा जिल्हाधिकारी असल्याची बतावणी करून या परिसरातून होणाऱ्या अवैध रेती वाहतूकदारांकडून लाखोंची वसुली केली आहे. काही वेळानंतर रेतीमाफी यांना हा तोतया असल्याची माहिती मिळली.

त्यांनी आलिशान गाडीतून आलेल्या या तोतया जिल्हाधिकाऱ्याचा पाठलाग केला मात्र ताे तोतया जिल्हाधिकारी गाडी सोडून फरार झाला हाेता. अखेरीस रेती माफीयांनी या तोतया जिल्हाधिकारीच्या आलिशान गाडीची तोडफोड केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकरणी देऊळगाव राजा तहसीलदारांनी अंढेरा पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञाता विराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस तोतया जिल्हाधिकारी याचा शाेध घेताहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT