Anandrao Adsul News, Sangali Latest Marathi News  saam tv
महाराष्ट्र

लढा उभारताना साम, दाम, दंड, भेदचा वापर करावा लागेल : माजी खासदार आनंदराव अडसूळ

सांगली आणि सातारा जिल्ह्यातील बॅंक कर्मचा-यांनी स्वाभिमान जागृत करावा असे आवाहन माजी खासार आनंदराव अडसूळ यांनी केले.

विजय पाटील

सांगली : ज्याला तोंडाची भाषा कळते त्याला ती भाषा आणि ज्याला हाताची भाषा कळते तिथं हाताची भाषा दाखवावीच लागते. कर्मचाऱ्यांना न्याय बाजारात मिळत नाह तर तो मनगटाच्या जोरावर मिळवावा लागतो. त्यामुळे लढा उभा करताना, साम, दाम, दंड आणि भेद या नीतीचा वापर करावाच लागेल असे परखड मत माजी खासदार आनंदराव अडसूळ (anandrao adsul) यांनी व्यक्त केले. सांगली (sangli) येथे आयोजिलेल्या सहकारी बँक (bank) कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याचे उदघाटन अडसूळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बाेलत हाेते. (Anandrao Adsul latest marathi news)

माजी खासदार आनंदराव अडसूळ म्हणाले राजकारणात (politics) विरोधाला विरोध नको. तत्वाने विरोध केला जावा. राजकारण शुद्ध हवे. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हटलेच पाहिजे.

कुठं गेला सांगली आणि सातारा (satara) जिल्हा. सांगली जिल्हा तर मनगटशाहीचा आणि ताकतवान जिल्हा आहे. मात्र तरी ही इथले कर्मचारी शांत कसे. कर्मचारी चळवळ कोणत्याही स्थितीत थंड आणि शांत ठेवू देऊ नका असे आवाहन अडसूळ यांनी केले. नोकरी देण्याचा अधिकार आहे. मात्र विना कारण कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याचा अधिकार कोणाला नाही असे अडसूळ यांनी नमूद करीत स्वाभिमानी विसरलेला आणि दाबावाखाली असलेल्या बँक कर्मचाऱ्यांना पहिला त्यांचातील स्वाभिमान जागृत करावा लागताे मग तो त्याच्या हक्कासाठी नक्की लढतो असे स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT