Amruta Fadnavis  SAAM TV
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचे राजकारण फक्त टोमणे मारण्याचे; अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका

भाजप कर्तुत्वाचा डाव खेळते, रडीचा डाव कधीच खेळात नाही अस उत्तर अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दिल आहे.

गोपाळ मोटघरे

पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी ज्या प्रकारे सवतःला राजकारणात झोकायला हव होत, त्या प्रकारे त्यांनी स्वतःला राजकारणात झोकल नाही, त्यांनी फक्त टोमणे मारण्याच राजकारण केलं अशी जहरी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केली आहे.

भाजप कर्तुत्वाचा डाव खेळते, रडीचा डाव कधीच खेळात नाही अस उत्तर अमृता फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना दिल आहे. त्याच बरोबर राज्यसभा निवडणुकीत भाजपने कोणत्या गैर मार्गाचा वापर केला नाही. सर्व अपक्ष आमदारांनी प्रेमापोटी भाजपला मतदान केलं असही अमृता फडणस यांनी सांगितलं.

हे देखील पाहा -

अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यातील लालबत्ती परिसरातील महिलांसाठी आरोग्य शिबीर आणि सुकन्या योजना कार्ड वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा नंतर बोलताना अमृता फडणवीस यांनी हे राजकीय वक्तव्य केल आहे.

वेश्या व्वसाय हा प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय असून, या व्यवसायामुळे समाजात संतुलन राखलं जातं. वेश्या व्यवसायाला देखील आता एका व्यवसायाचा दर्जा आहे आणि त्याला इतर व्यवसाया प्रकारेच प्रतिष्ठा मिळायला पाहिजे असं आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे तुम्ही जो व्यवसाय करता, त्याचा तुम्हाला गर्व असायला हवा अस देखील अमृता फडणवीस यांनी य कार्यक्रमात भाषण करताना स्पष्ट केल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rain: पुण्यासाठी पुढचे ३ तास महत्वाचे, वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपून काढणार

Gulab Kulfi Recipe : उन्हाळ्यात करा आईस्क्रीम पार्टी, घरीच झटपट बनवा थंडगार 'गुलाब कुल्फी'

BMC News Mumbai: भाजप नगरसेवकाचा मोठा निर्णय; ५ वर्षांचं मानधन, भत्ते महापौरनिधीला देणार, इतर नगरसेवकांची भूमिका काय?

Mangalsutra Designs: 4 ते 5 ग्रॅममध्ये सोन्याच्या मंगळसूत्राचे 5 लेटेस्ट डिझाईन्स, लूक दिसेल सुंदर आणि राजेशाही

Maharashtra Live News Update: मालवणीत ३७ किलो गांजा जप्त; ३ जणांना अटक

SCROLL FOR NEXT