devendra fadnavis and amruta fadnavis  saam tv
महाराष्ट्र

Amruta Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना कोट्यवधी बहीण अन् मला तेवढ्यात नणंद लाभल्या : अमृता फडणवीस

Amruta Fadnavis on Ladki Bahin Yojana : देवेंद्र फडणवीसांना कोट्यवधी बहीण आणि मला तेवढ्यात नणंद मिळाल्याचं वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केलं आहे. अमृता फडणवीस आणि भाजप महिला आघाडीने दिव्यांग बांधवांसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

Vishal Gangurde

पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

नागपूर : 'लाडकी बहीण योजनेमुळे देवेंद्र फडणवीसांना कोट्यवधी बहीण तर मला नणंद लाभल्या आहेत, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवर दिली आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होत्या.

अमृता फडणवीस यांनी नागपुरात दिव्यांग बांधवांना राखी बांधल्या. भारतीय जनता पक्षाच्या दिव्यांग आघाडीकडून नागपुरात दिव्यांग बांधवांना राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी अनेक दिव्यांग बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनचा सण साजरा केला. अमृता फडणवीस म्हणाल्या, 'देवेंद्र फडणवीस यांनी बहिणीच्या रक्षणसाठी लाडकी बहीण योजना आणली. त्यात राजकीय दृष्टिकोन नाही'.

अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या, 'लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना कोट्यवधी बहिणी लाभल्या असून मलाही तेवढ्याच नणंद लाभल्या आहेत. आमचं नवीन नणंद भावजयचं नातं सुरू झाल आहे'.

'देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शक पणावर प्रामाणिकपणावर विरोधक याआधी सुरू केलेल्या जलयुक्त शिवार सारख्या अनेक चांगल्या योजनांवर ही विरोधकांनी टीका केली होती. त्यामुळे ते आताही टीका करत आहेत. सरकारने चांगले हेतूने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ती पुढेही सुरू ठेवतील. त्यात आवश्यक वाढ करतील अशी अपेक्षा आहे, असं अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या.

'मी आधी माझ्या दोनच भावांना राखी बांधायचे. आता दिव्यांग बांधवांना बांधत आहे, असेही अमृता फडणवीसांनी सांगितलं.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवास्थानी भाजप दिव्यांग आघाडीकडून रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अमृता फडणवीस यांच्यासह भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी या दिव्यांग बांधवाना राख्या बांधल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

SCROLL FOR NEXT