Yavatmal, Video Viral, Amrut Yojna saam tv
महाराष्ट्र

Viral Video : लाव्हा नव्हे पाण्याचा फवारा, पालकमंत्र्यांच्या घराजवळ जलवाहिनी फुटली; युवती जखमी (पाहा व्हिडिओ)

या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल हाेत आहे.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठाेड

Yavatmal : ज्वालामुखी फुटल्यानंतर ज्या पद्धतीने लाव्हा बाहेर येताे अगदी तशाच पद्धतीने रस्ता दुभंगल्याने पाणी बाहेर आल्याचे कमॅर-याने टिपले आहे. हे दृष्य पाहताना काही क्षण आपण स्तब्धच राहताे. दुसरीकडे या पाण्याच्या फवा-याचा एका मुलीने धाडसाने सामना केल्याची चर्चा यवतमाळ (yavatmal) शहरात आहे. (Breaking Marathi News)

यवतमाळ शहरातील यवतमाळ विदर्भ हाऊसिंग सोसायटीतील माईंदे चौक ते हिंदी हायस्कूल रस्त्यावरील जलवाहिनी फुटली. ही जलवाहिनी फुटल्यानंतर रस्त्याचा एक भाग सुमारे दाेन फुट हवेत उडाला. जलवाहिनी फुटताच पाण्याचा फवारा रस्त्याच्या दुभाजकापर्यंत (सुमारे 50 मीटर अंतर) गेला. जलवाहिनी फुटल्याने लाखाे लिटर पाणी वाया गेले आहे.

यावेळी दुचाकीवरुन निघालेली एका युवतीच्या अंगावर अचानकपणे पाणी आल्याने तिचा दुचाकीवरचा ताेल गेला. त्यात ती जखमी झाली. दरम्यान या घटनेनंतर रस्त्यास माेठा खड्डा पडला आहे.

यवतमाळ अमृत पाणी पुरवठा योजनेत वापरण्यात आलेली जलवाहिनी ही निकृष्ट दर्जाची असल्याची चर्चा समाज माध्यमातून सुरु आहे. ही घटना पालकमंत्री संजय राठाेड यांच्या घराजवळ घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल हाेऊ लागला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT