Amruta Fadnavis Saam TV
महाराष्ट्र

Amruta Fadnavis: गांधी जुन्या तर मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता; अमृता फडणवीसांचं मोठं विधान

आहे. तसेच आपल्या देशात दोन राष्ट्रपिता आहेत असे त्यांनी म्हटले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Amruta Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याकडे नेहमीच महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असते. त्यांच्या अनेक वक्तव्यांवरून त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. मात्र मी कुणालाच घाबरत नाही. सामान्य नागरिक माझ्यावर टीका करत नाहीत. विरोधकांच्या टीकेला उत्तर देणे मला महत्वाचे वाटत नाही, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी त्यांच्या आयुष्यात त्या सर्वात जास्त कोणाला घाबरतात याचा खुलासा केला आहे. तसेच आपल्या देशात दोन राष्ट्रपिता आहेत असे त्यांनी म्हटले आहे. (Latest Marathi News)

मंगळवारी नागपूर येथे अभिरुप न्यायालय पार पडले यावेळी अमृता फडणवीस यांनी संघात माझी तक्रार केल्याचं म्हटलं. त्या म्हणाल्या की, " मला राजकारण आवडत नाही. मला त्यात रसही नाही. त्यामुळे मी खूप कमी राजकीय गोष्टींवर मत देत असते. माझ्यासाठी आणि देवेंद्रजींसाठी हे चांगल फायद्याचं आहे. आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत." असे अमृता माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

"मी आधी फार शांत आणि लाजरी होते. पण आता मी माझी मतं ठामपणे मांडते. मी खूप जास्त बोलते असे संघात सांगण्यात आले होते. मात्र माझ्या बोलण्याचा फायदा लोक दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून घेत आहेत. ही गोष्ट माझ्या लक्षात आली आहे. मी खूप बोलते हे अगदी खरं आहे. मात्र माझा स्वभावच तसा झाला आहे. कोणतीही प्रतिमा तयार करण्यासाठी मी जास्तीचे बोलत नाही." असे अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) म्हणाल्या.

अमृता फडणवीस या दोन व्यक्तींना खूप घाबरतात

जे २४ तास राजकारणासाठी काम करतात आपला पूर्ण वेळ जनतेसाठी देतात तेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत. मला कोणतेही वक्तव्य करताना कोणाचीही भीती वाटत नाही. कारण मी फक्त माझी आई (Mother ) आणि सासूबाई या दोघींनाच घाबरते. इतर कोणत्याही व्यक्तीची मला भीती वाटत नाही, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खगोलशास्त्रातील आणखी एक तारा हरपला

Manoj Jarange : हत्येची सुपारी देणारा नेता कोण? जरांगे पाटील करणार मोठा गौप्यस्फोट

Ajit Pawar News : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एक पाऊल पुढे, भाजप-शिवसेनेच्या आधी जाहीर केला उमेदवार

Maharashtra winter : महाराष्ट्राचा पारा घसरला, गुलाबी थंडी कधी येणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो

Spiritual benefits: कार्तिक मासातील पवित्र एकादशी; आरोग्य, कामकाज आणि नात्यांवर कसा होईल प्रभाव?

SCROLL FOR NEXT