चिखलदरा : सेल्फी, फोटोच्या नादात अनेक तरुण- तरूणीनी आतापर्यंत आपला जीव गमावल्याच्या घटना आपण एकत असतो. परंतु, एवढ्या घटना घडून सुद्धा तरुण- तरूणी यातून काहीच धडा घेत नसल्याचे वेळोवेळी समोर येत आहे. जिवापेक्षा फोटो, सेल्फी महत्वाचा आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण अमरावतीच्या चिखलदरा पर्यटन स्थळावर नागपूर मधील तरुणांची हुल्लडबाजी समोर आली आहे.
हे देखील पहा-
चिखलदरा मधील हरिकेन पॉइंटवर जीव धोक्यात टाकून हजारो फूट खोल दरीच्या काठावरील दगडावर उभे राहून तरुणांनी जीवघेण फोटोसेशन करत आहे. त्यामुळे या हुल्लडबाजांचा जीव महत्वाचा नाही का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. (Amravati tourists Riot danger)
चिखलदऱ्यात अनेक जीवघेने पॉइंट आहे. त्यामुळे पर्यटकांनी तिथे फोटो सेशन करू नये अशा आशयाचे फलक लावून देखील पर्यटक मात्र, त्यातून काहीच बोध घेत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.