Amravati Latest News: Saamtv
महाराष्ट्र

Police Recruitment: पोलीस भरतीला पावसाचा फटका! मैदानावर चिखल; भरती पुढे ढकलण्याची अमरावतीतून मागणी

Amravati Police Recruitment update: सध्या अमरावती ग्रामीण पोलिसाकडून महिलांसाठी पोलीस भरती सुरू आहे. ग्राऊंडवर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने भरती पुढे ढकलण्याची आक्रमक मागणी भरतीसाठी आलेल्या मुलींनी केली आहे.

Gangappa Pujari

अमर घटारे, अमरावती|ता. ९ जुलै २०२४

सध्या अमरावती ग्रामीण पोलिसांची महिलांची पोलीस भरती सुरू आहे. मात्र अमरावतीत मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला त्यामुळे मैदान पूर्णपणे पावसात भिजले आहे. ग्राऊंडवर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने भरती पुढे ढकलण्याची आक्रमक मागणी भरतीसाठी आलेल्या मुलींनी केली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचाच फटका अमरावतीमध्ये सुरू असलेल्या ग्रामी महिला पोलीस भरतीलाही बसल्याचे पाहायला मिळाले.

सध्या अमरावती ग्रामीण पोलिसांची महिलांची पोलीस भरती सुरू आहे. मात्र अमरावतीत मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे मैदान पूर्णपणे पावसात भिजले असून मैदानावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अशा परिस्थितीत मुलींची मैदानी चाचणी झाली तर त्यांना धावणे व इतर शारीरिक चाचणी करणे अशक्य आहे.

त्यामुळे मुलींची आजची पोलीस भरती पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. सकाळी चार वाजल्यापासून मोठ्या संख्येने मुली या मैदानी चाचणीसाठी अमरावती ग्रामीण पोलिसांच्या जोग स्टेडियम बाहेर जमल्या असून आजची पोलीस पोलीस भरती पुढे ढकलन्याची आक्रमक मागणी मुलींनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Padsare Waterfall : धबधब्यावर भिजायला आवडतं? मग 'पडसरे धबधबा' तुमच्यासाठी ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra Politics : भाजपला नवी मुंबईत खिंडार, ठाकरे गटाने दिला मोठा धक्का; VIDEO

नगरसेवकाचा लोगो, BMW गाडी आणि आत 32 कोटींचं MD ड्रग | VIDEO

Maharashtra Live News Update: ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: चिकन-मटण शॉपवर बंदी घालणं अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य; मग आदेश कोणी काढला?

SCROLL FOR NEXT