Car racing Saam Tv News
महाराष्ट्र

Crime News: विद्यार्थ्यांची कार रेसिंग अन् जीवघेणा स्टंट; पोलिसांनी दाखवला इंगा, केली दंडात्मक कारवाई

Amravati Police Crackdown on Racing: विद्यार्थ्यांना कारची शर्यत लावणं चांगलंच अंगलटी आलं आहे. कारची शर्यत लावून स्टंटबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे.

Bhagyashree Kamble

कारची शर्यत लावून स्टंटबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी ५ कार जप्त केल्या आहेत. काही विद्यार्थ्यांनी आधी अमरावती महामार्गावर कारची शर्यत लावली. होती. नंतर स्टंटबाजी केली. तसेच व्हिडिओ शुट करून व्हायरलही केला. व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी दंडात्मक कारवाई करत कार जप्त केल्या आहेत.

अमरावती मार्गावर विद्यार्थ्यांना कारची शर्यत लावणं चांगलंच अंगलटी आलं आहे. काही विद्यार्थ्यांनी महामार्गावर कारची शर्यत लावली होती. कारची शर्यत लावताना त्यांनी स्टंटबाजी केली होती. त्यांची ही हुल्लडबाजी काही लोकांनी कॅमेऱ्यात कैद केली.

विद्यार्थ्यांनी देखील कारची शर्यत आणि स्टंटबाजी करून व्हिडिओ शुट केले. शुट केल्यानंतर त्यांनी हे व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केले आहेत. सोशल माध्यमांमध्ये व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी तपास करत सगळ्या कार जप्त केल्या आहेत.

कार जप्त केल्यानंतर पोलीस मालकांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांना या घटनेची माहिती देऊन विद्यार्थ्यांनी केलेला प्रताप सांगितला आहे. तसेच विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT