AMRAVATI POLICE RECOVER 377 LOST AND STOLEN MOBILE PHONES WORTH ₹65 LAKH saam tv
महाराष्ट्र

पोलिसांची मोठी कामगिरी; ३७७ हरविलेले अन् चोरी गेलेले मोबाईल तक्रारदारांना परत

Amravati police recover lost and stolen mobile phones using CEIR portal: अमरावती शहर पोलिसांची मोठी कामगिरी; CEIR पोर्टलच्या मदतीने तब्बल ३७७ हरविलेले व चोरीस गेलेले मोबाईल तक्रारदारांना परत. सुमारे ₹६५ लाखांहून अधिक किमतीचे मोबाईल हस्तगत.

Omkar Sonawane

अमर घटारे, साम टीव्ही

बाजारात, प्रवासात अनेकांचे फोन हरवतात, त्यासाठी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली जाते. पण अनेक प्रयत्नानंतरही चोरट्यांनी डल्ला मारलेला फोन काही सापडत नाही. पण अमरावती पोलिसांनी तब्बल ३७७ फोन शोधून काढले आहेत. अमरावतीमधील विविध शहरात फोन हरवल्याच्या, चोरीच्या तक्रारीसाठी संयुक्त कारवाई करत पोलिसांनी फोन शोधून मालकाला परत केले आहेत. अमरावती पोलिसांचे या कारवाईमुळे शहरात कौतुक होत आहे.

शहर पोलिसांनी सायबर तपासाच्या माध्यमातून मोठी कामगिरी करत तब्बल ३७७ हरविलेले आणि चोरीस गेलेले मोबाईल शोधून संबंधित तक्रारदारांना परत केले आहेत. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या मदतीने सायबर पोलीस ठाणे तसेच शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुमारे ₹६५ लाख ६३ हजार ८०० किमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. या मोबाईलचे वितरण पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.

या प्रसंगी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले. मोबाईल हरविल्यास किंवा चोरीस गेल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी आणि CEIR पोर्टलवर माहिती भरावी, असे त्यांनी सांगितले. तसेच कोणत्याही सायबर गुन्ह्याबाबत राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असेही त्यांनी नमूद केले. अमरावती शहर पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे सायबर गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर शहरात मुसळधार पाऊस, रस्त्यांना नदीचे स्वरूप

IPS Transfer List: राज्यातील पोलीस विभागात मोठा फेरबदल; १५ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या कोणाची कुठे झाली पोस्टिंग

Gaurav Gogoi: शिक्षण व्यवस्थेवर चर्चा करण्याऐवजी पंतप्रधान इंस्टाग्राम रिल्समध्ये व्यस्त; गौरव गोगोईंचा सरकारवर हल्लाबोल

JR. NTR: सुपरस्टार ज्युनियर एनटीआरला डॉक्टरांनी दिला बेड रेस्टचा सल्ला; अभिनेत्याला नेमकं काय झालं?

Japan Earthquake: भूकंपाच्या धक्क्याने जपान हादरले, ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के; त्सुनामीचा इशारा, थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT