Amravati Doctor Beaten By People Saam Tv
महाराष्ट्र

Amravati News: गर्दी कमी करा असं सांगितलं म्हणून डॉक्टरला मारहाण, तिघांना अटक, घटना CCTV मध्ये कैद

Amravati Police: बुधवारी रात्री डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत डॉक्टर रवी भूषण हे जखमी झाले होते. ही घटना सीसीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली होती. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात डॉक्टरने तक्रार दाखल केली होती.

Priya More

अमर घटारे, अमरावती

अमरावतीच्या (Amravati) जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवी भूषण यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली होती. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी रात्री डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत डॉक्टर रवी भूषण हे जखमी झाले होते. ही घटना सीसीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली होती. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात डॉक्टरने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर १० ते १५ अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आज पोलिसांनी (Amravati Police) तिघांना अटक केली आहे.

अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात डॉक्टर रवी भूषण हे रुग्णांची तपासणी करत असताना त्याचवेळी एका रुग्णांसोबत काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी गर्दी केली होती. ही गर्दी कमी करावी म्हणून डॉक्टर रवी भूषण यांनी या रुग्णाच्या नातेवाईकांना गर्दी कमी करा असे सांगितले. त्यावरून रुग्णांचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्यात वाद झाला. हा राग मनामध्ये ठेवत रुग्णांच्या १० ते १५ नातेवाईकांनी डॉक्टर रवी यांना रुग्णालयाबाहेर येताच बेदम माराहण केली.

मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेनंतर डॉक्टर रवी यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी डॉक्टरला मारहाण करणाऱ्या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी आरोपीविरोधातर विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी मोहम्मद अल्तमश मोहम्मद रशीद , मोहम्मद मोहम्मद हनीफ, मुदस्सर खान साबीर खान या तीन आरोपींना अटक केली. सीसीटीव्हीच्या आधारे इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. मात्र या घटनेने जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला. या घटनेमुळे डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT