Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati News : गावात पाण्याची कृत्रिम टंचाई; महिलांनी ठोकले ग्रामपंचायतला कुलूप

Amravati News : अमरावतीच्या दहेन्द्री या गावाची लोकसंख्या दोन हजाराच्या जवळपास आहे. गावात पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी योजना करण्यात आली आहे.

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री या गावात मागील पंधरा दिवसापासून कृत्रिम पाणी टंचाई जाणवत आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची नळ योजना बंद असल्यामुळे गावात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे संतप्त महिलांनी आज ग्रामपंचायतला कुलूप ठोकले आहे. 

अमरावतीच्या (Amravati) दहेन्द्री या गावाची लोकसंख्या दोन हजाराच्या जवळपास आहे. गावात पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी योजना करण्यात आली आहे. मात्र मागील पंधरा दिवसांपासून हि योजना बंद आहे. परिणामी गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती (Water Scarcity) करावी लागत आहे. यामुळे गावात पुन्हा साथरोगाची लागण होण्याची शक्यता आहे. गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाची नेहमी पाण्यासंबंधित चर्चा व तक्रार केली यानंतरही समस्या जैसे थे आहे. 

जोरदार नारेबाजी 

ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर देखील ग्रामपंचायत प्रशासन मार्फत गावात पाण्याची समस्या सोडविण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी व महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावत टाळा ठोको आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला आहे. यावेळी गावातील पुरुष व महिलांनी ग्रामपंचायतला कुलूप लावले व ग्रामपंचायतच्या विरोधात जोरदार नारे बाजी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT