Bachchu Kadu Saam tv
महाराष्ट्र

Bachchu Kadu : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर सरकारला धोका; आमदार बच्चू कडू यांचा इशारा

Amravati News : जाती- धर्माभोवती राजकारण फिरत; तसं शेतकऱ्याच्या भोवती ज्या दिवशी राजकारण फिरेल, तेव्हा शेतकरी शेतमजुरांचे भलं होईल

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला तेव्हाच यांचा भरोसा वाढेल. नाही तर वाढणार नाही. उलट सरकारला धोका भेटणार; असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी महायुती सरकारला दिला आहे. केंद्र सरकारने सोयाबीन व कापसाचे हमीभाव दोन हजार रुपये कमी केले. त्यामुळे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच नुकसान झाल्याचे देखील बच्चू कडू यांनी म्हटले आहे. 

अमरावती (Amravati) येथे आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राजकारण शेतकऱ्यांच्या भोवती फिरलं पाहिजे. जसं जाती- धर्माभोवती राजकारण फिरत; तसं शेतकऱ्याच्या भोवती ज्या दिवशी राजकारण फिरेल, तेव्हा शेतकरी शेतमजुरांचे भलं होईल; असेही आमदार कडू (Bachchu Kadu) यांनी सांगितले. 

अनेक आमदार शरद पवार गटात जातील 
अजित पवार यांचे आमदार विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटात जाऊन निवडून लढू शकतात; अशी एकंदरीत परिस्थिती आहे असा दावा बच्चू कडू यांनी केला. शेवटी आमदाराला मतदार संघात निवडून यायचं असते. पक्ष त्याच्यासाठी फार महत्त्वाचा नाही. निवडून येणं महत्वाचे आहे. लोकांना अजित दादा अशी उडी घेणार हे पटलं नाही. तर भाजप व राष्ट्रवादी यांची विचारधारामध्ये तफावत असल्याचे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रायगड ते रत्नागिरी प्रवास आता जलद; ‘वेश्वी-बागमांडला’ फेरीबोट सेवेची क्रेझ वाढली, कोकण पर्यटनासाठी मोठा दिलासा

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी

Shocking: भुकेनं व्याकुळ मुलानं दूध मागितलं, संतापलेल्या बापानं ४ वर्षाच्या पोराला दरवाजावर आपटलं

राज्यातील 80 लाख महिला अपात्र! ₹1500 सरकारच्या डोळ्यात खुपताय का?

पोटावरची चरबी झटक्यात उतरेल! सकाळी दुधासोबत प्या 'या' हिरव्या पानांची पावडर

SCROLL FOR NEXT