Amravati Lok Sabha Saam tv
महाराष्ट्र

Amravati Lok Sabha : निवडणुकीचा खर्च सादर न करणाऱ्या सहा उमेदवारांना नोटीस; ४८ तासात खर्च सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Amaravati News : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने ठरवून दिल्यानुसार दैनंदिन खर्च सादर करावा लागत असते.

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाले आहे. यात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांना आपला दैनंदिन खर्च सादर करावा लागत असताना (Amravati) अमरावती मतदार संघाच्या रिंगणात असलेल्या ६ उमेदवारांनी खर्च सादर केला नाही. यामुळे त्यांना जिल्हाधिकारी यांनी नोटीस बजावली आहे. (Maharashtra News)

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने ठरवून दिल्यानुसार दैनंदिन खर्च सादर करावा लागत असते. त्यानुसार अमरावती लोकसभा मतदार संघात ३७ उमेदवार निवडणुकीच्या (Election) रिंगणात असून त्यांना देखील आपला दैनंदिन खर्चाचा अहवाल निवडणूक विभागाकडे सादर करावा लागतो. मात्र खर्चाच्या पहिल्या तपासणीच्या वेळी ३७ पैकी सहा उमेदवार अनुपस्थित होते. यामुळे त्या सहा उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या अनुपस्थित असणाऱ्या उमेदवारांना ४८ तासाच्या आत निवडणूक खर्चाचे लेखे निवडणूक सन नियंत्रण व खर्च कक्षात सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी दिली आहे. विहित मुदतीत खर्च साधारण न केल्यास तक्रार दाखल करून सर्व परवानग्या रद्द करण्यात येणार असल्यास सुद्धा त्यांना नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: झेंडा, स्कार्फ, पक्षचिन्ह काहीच नको; मोर्चाला येण्याआधी राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

Crime: विद्यार्थ्यावर कधी कार, तर कधी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये अत्याचार, गोळ्याही द्यायची; मुंबईतील शिक्षिकेचे धक्कादायक कारनामे उघड

Maharashtra Live News Update: बदलापुरात आमदार किसन कथोरेंच्या घराबाहेरील रस्त्यावर गोळीबार

PF Balance Check: आता इंटरनेटशिवायही काही सेकंदात पीएफ बॅलन्स चेक करु शकता, कसं? वाचा

मुख्यमंत्र्यांच्या 'Flying Squad'चा जुगार अड्ड्यावर छापा! ५५ गॅम्बलरला अटक; १२ लाख रोकड, ४६ मोबाईल अन् डझनभर गाड्या जप्त

SCROLL FOR NEXT