Drug Seized Amravati Saam tv
महाराष्ट्र

Amravati Police : अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड; एमडी, गांजा, विदेशी मद्य जप्त

Drug Seized Amravati: अवैधपणे हुक्का पार्लर शहरात सुरु होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाड टाकत मुद्देमाल हस्तगत केला आहे तर येथून अकरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : अमरावती शहरात अवैधपणे सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर शहर गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने धाड टाकत कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २ लाख ८७ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये एमडी ड्रग्स देखील आढळून आले आहेत. यात काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

अमरावती शहरातील रायली प्लॉट येथे अवैध हुक्का पार्लर सुरु होता. यानंतर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार प्रमेन्द्र ओमप्रकाश शर्मा (वय ५५) याने आपल्या घराच्या टेरेसवर काफिला नावाचा हुक्का पार्लर चालवत असल्याचे समोर आले. तेथे विदेशी दारू विक्री व अंमली पदार्थांचे सेवनही होत असल्याची खात्री पटल्यावर पथकाने धाड टाकत कारवाई केली आहे.  

पोलिसांशी घातली हुज्जत 

पोलिसांनी हुक्का पार्लरवर वर धाड टाकत याठिकाणाहून २ लाख ८७ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात एम.डी. (मॅफेडॉन) अंमली पदार्थ, गांजा, विदेशी दारू, हुक्का सेवन साहित्य आणि मोबाईल यांचा समावेश आहे. यावेळी पथकाला प्रतिकार करत आरोपींनी हुज्जतबाजी, झटापट केली आणि काही ग्राहकांना पळवून लावण्याचा प्रयत्न केला. पोलिस आयुक्त अरविंद चावरीया यांच्या आदेशानुसार पीआय संदीप चव्हाण यांच्या  पथकाने ही कारवाई केली आहे.  

११ जणांना घेतले ताब्यात 

दरम्यान पोलिसांच्या पथकाने कारवाई पूर्ण करत याठिकाणाहून एकूण ११ आरोपींना ताब्यात घेतले आहेत. तसेच त्यांच्याकडून २५ ग्रॅम गांजा, ३ ग्रॅम एम.डी., विविध हुक्का साहित्य, नगदी व विदेशी दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी अधिक चौकशी सुरु असून पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

SCROLL FOR NEXT