Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati News : ग्रामपंचायतीने केला दारूबंदीचा ठराव; गावात अवैध धंदे फोफावल्याने ग्रामस्थ हैराण

Amravati News : गुरुदेवनगरातच सध्या अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे नागरिक चिंताग्रस्त आहेत

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: अमरावतीच्या तिवस्यातील गुरुदेवनगरात अवैध धंदे चांगलेच फोफावले आहेत. यामुळे नागरिक वाम मार्गाला लागत आहेत. गावात सर्रास दारू विक्री होत असून या प्रकाराकडे पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याने ग्रामपंचायतीनेच दारूबंदीसह अवैध धंदे बंद करण्याचा ठराव केला आहे. 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून संपूर्ण देशात ग्रामनिर्माणाची चळवळ उभारली. या चळवळीचे केंद्र होतं ते (Amravati) अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथील आश्रम. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दारूबंदी, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलनावर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. मात्र त्यांच्या आश्रमालगत असलेल्या गुरुदेवनगरातच सध्या अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे नागरिक चिंताग्रस्त आहेत. 

पोलिसांचे दुर्लक्ष 

गावातील अवैध धंदे बंद करण्याबाबत पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करता दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे (Gram Panchayat) ग्रामपंचायतीने नाईलाजास्तव गावात दारू बंदीसह अवैध धंदे बंद करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्याची वेळ आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

National Film Awards : ७२ वर्षांचा इतिहास बदलला; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार

Tuesday Horoscope: कामाच्या ठिकाणी ताण वाढेल, ७ राशींचा खर्च कमी होणार; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT