Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Golden Crown : मुकुट सोनेरी की पितळचा?; चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेला मुकुट वादाच्या भोवऱ्यात

Amravati News : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले. मात्र माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या कार्यालयात सोनेरी मुकुट घालत स्वागत करण्यात आले

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: पालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीत आले. यावेळी माजी मंत्री व भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण पोटे यांनी मंत्री बावनकुळे यांचे सोनेरी मुकुट घालून स्वागत केलं. याबाबत बातम्या येताच चंद्रशेखर बावनकुळे यांनी तो मुकुट सोन्याचा नसून पितळचा असल्याचा खुलासा केला. मात्र ही घटना पुन्हा ट्रोल करणारी ठरल्याने त्यावर फक्त सोन्याचा मुलामा असल्याचं सांगण्यात आलं, तरीसुद्धा ही चर्चा थांबत नसल्याने बावनकुळे यांनी हा मुकुट भाजप पदाधिकाऱ्यांच्या स्वाधीन केला. 

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांचे ठिकठिकाणी स्वागतच केले जात आहे. मात्र बावनकुळे यांचा माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांच्या कार्यालयात सोनेरी मुकुट घालत स्वागत करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आले होते. मात्र तो मुकुट सोन्याचा नसून पितळचा आहे व त्याला सोनेरी मुलामा दिला असा खुलासा माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी दिला. तसेच यापूर्वी राजनाथ सिंग, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे आणि रा. सू. गवई यांनाही सोनेरी मुकुट दिले होते. विरोधकांनी त्या पोस्ट केल्या असल्याचा आरोप पोटे यांनी केला. 

अमरावती भाजपकडे मुकुट स्वाधीन 
महाराष्ट्रात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीला घवघवीत यश प्राप्त झाले. ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आज सकाळी भाजप अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष प्रवीण पोटे पाटील यांनी सोनेरी मुकुट देऊन स्वागत केले होते. मात्र भाजपाला मिळालेला विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या निष्ठापूर्वक परिश्रमातून मिळाला असल्याने आपण हा सोनेरी मुकुट अमरावती शहर जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना भेट म्हणून देत असल्याचे स्पष्ट करून चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुकुट शहर भाजपाच्या स्वाधीन केला. 

समाजोपयोगी कार्यासाठी केला मुकुट अर्पण

दरम्यान या मुकुटातून येणाऱ्या आर्थिक रक्कमेतून समाजोपयोगी उपक्रमात ही रक्कम खर्च करावी; असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती भाजपाच्या कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्पष्ट केले. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी आपल्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचा केलेला हा गौरव सामान्य कार्यकर्त्यांना सुखावून गेला आणि बावनकुळे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून एक आगळावेगळा आदर्श सर्व कार्यकर्त्यांच्या समक्ष प्रस्तुत केल्याचे बोलले जात आहे. 

सोनेरी मुकुट नाही तर आर्थिक रक्कम कशी?

दरम्यान या मुकुटातून प्राप्त होणाऱ्या आर्थिक रकमेतून समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा सल्ला देण्यात आला. हा मुकुट सोनेरी मुकुट नाही तर मग यातून आर्थिक रक्कम कशी मिळेल. यातून समाज उपयोगी रक्कम कशी मिळेल? असा सवाल उपस्थित होतं आहे. मात्र अमरावतीमध्ये हा मुकुट मात्र चांगलाच गाजला असून याची चर्चाही राज्यभर आणली आहे. तर मुकुट देणारे प्रवीण पोटे यांनी मात्र सोनेरी मुकुट बाबत सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट एडिट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT