Amravati Corona Virus Saam tv
महाराष्ट्र

Amravati Corona Virus : अमरावती शहरात पुन्हा चार कोरोना बाधित, तीन स्वाइन फ्लूचे रुग्ण

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात साथरोग पसरले आहेत. यात प्रामुख्याने डेंग्यू व चिकुनगुनियाची साथ अधिक आहे. याच दरम्यान शहरामध्ये तीन दिवसा आधीच सहा कोरोना बाधित रुग्ण पॉझिटिव्ह आले असताना आता पुन्हा आज चार कोरोना बाधित रुग्ण पॉझिटिव्ह आले आहे. यामुळे शहरात सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान आरोग्य विभाग देखील अलर्ट मोडवर आले असून उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. 

अमरावती (Amravati) शहरात अगोदरच डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. यात आता कोरोना आणि स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. अचानक वातावरणात झालेला बदल आणि पावसाचे दिवस असल्यामुळे साथरोग वाढत आहे. शहरात घाणीचे साम्राज्य अधिक असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव देखील वाढला आहे. परिणामी हेच डास कोरोना (Corona Virus) वाढीस कारणीभूत ठरत आहे.

अमरावतीमध्ये कोरोनाचे नवीन चार रुग्ण आढळून आले असून तीन स्वाइन फ्लूचे रुग्ण सुद्धा आढळले आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे आता अमरावती शहरांमध्ये एकूण दहा कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. नवीन पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे नमुने हे पुणे येथील प्रयोग शाळेमध्ये पाठवण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: ब्रेकिंग! जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात; ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

SCROLL FOR NEXT