Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati : महसूल मंत्र्यांच्या नावाचे बनावट लेटरहेड व सही; अमरावती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

Amravati News : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने अमरावती जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवत यामध्ये मोर्शी येथील एका वरिष्ठ लिपिकावर कारवाई करण्यासंदर्भात हे पत्र आहे

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचे बनावट लेटर हेड व त्यांची बनावट सही केल्याचे समोर आले आहे. हे पत्र जिल्हाधिकारी यांनाच पाठविण्यात आल्याचा प्रकार अमरावतीमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बऱ्याचदा मंत्री तथा आमदारांचे लेटर हे त्यांच्या संपर्क कार्यालयात ठेवण्यात आलेले असतात. काही कामानिमित्ताने त्यांचे कार्यकर्ते या लेटर हेडचा वापर करत असतात. मात्र अमरावतीमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बनावट सहीचे लेटर हेड एका अज्ञाताने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने अमरावती जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवत यामध्ये मोर्शी येथील एका वरिष्ठ लिपिकावर कारवाई करण्यासंदर्भात हे पत्र आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आली बनावट स्वाक्षरी 

दरम्यान सदरचे पत्र बनावट स्वाक्षरीसह लेटर हेडवर दिले होते. लेटर हेड पाहून जिल्हाधिकाऱ्यांना शंका आल्याने त्यांनी हे लेटर तपासले असता त्यांना लेटरहेडसह पालकमंत्री व महसूल मंत्र्यांची सही ही बनावट असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार लक्षात येताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वीय सहायक योगेश कोठेकर यांना याबाबत माहिती देण्यात आली. 

पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान सदरचा प्रकार गंभीर आहे. याचा कोणी गैरफायदा घेण्याची शक्यता असल्याने मंत्री बावनकुळे यांचे स्वीय सहाय्यक कोठेकर यांनी तत्काळ बनावट लेटरहेड व बनावट सही करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध अमरावतीच्या गाडगे नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर सोन्यात 800 रुपयांची तर चांदी 1000 ची घसरण

Tula Pahta Movie: पहिलं प्रेम म्हणजे न विसरता येणारी आठवण...; 'तुला पाहता' उलगडणार चित्रपटातून तरल प्रेमाची अनवट कहाणी

8th Pay Commission: शिपाई ते IAS अधिकारी; आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार?

Railway Rules : रेल्वेचा मोठा निर्णय! ट्रेनमधील मिडल बर्थ सकाळच्या सुमारास राहणार बंद, काय आहे या मागचं कारण?

दरवाढीचा भडका! डिझेल २५ रुपये, तर पेट्रोल इतक्या रूपयांनी महागण्याची शक्यता; पेट्रोलियम मंत्री नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT