Daryapur Police Station Saam Tv
महाराष्ट्र

Amravati News: आई होण्याचं स्वप्न दाखवत ढोंगी बाबाचा महिलेवर अत्याचार; अमरावतीतील धक्कादायक प्रकार

या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

Shivani Tichkule

अमर घटारे

Amravati Crime News: अमरावतीमध्ये गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. (Latest Marathi News)

त्यातच आता अमरावतीमधून (Amravati) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आई होण्याचं स्वप्न दाखवत ढोंगी बाबाने महिलेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी अकरा जिल्ह्यतील दर्यापूर येथील ढोंगी बाबा विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आई होण्याचं स्वप्न दाखवत एका महिलेवर ढोंगी बाबाने नदीकाठी अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फरार ढोंगी बाबा याला 24 तासात ठाणेदार संतोष ताले यांनी अटक केली आहे. (Amravati News)

ही घटना दर्यापूर तालुक्यातील कुकसा इथे घडली आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी व पोलीस प्रशासन दाखल झाले. या बाबाकडे दर पौर्णिमेला बाबाच्या घरी मोठ्या संख्येने मूल बाळ व्हावे यासाठी भक्तांची गर्दी होत असल्याची माहिती. बलात्कारासह जादूटोणा सह विविध कलमानुसार बाबा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रायगडच्या माझेरी घाटात ST बसला अपघात

Crime : छातीला स्पर्श करायचा, नको त्या जागी हात...; महिला सहकाऱ्यांची तक्रार, नराधम डॉक्टरला अटक

Severe period cramps: काही महिलांना मासिक पाळीत तीव्र वेदना का होतात? रिसर्चमधून उलगडलं कारण

Nitin Gadkari : टॉयलेटचे पाणी आणि कचऱ्यापासून बांधणार इमारती अन् हायवे, केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन, वाचा सविस्तर

Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोर तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT