Banjara Community Saam tv
महाराष्ट्र

Banjara Community : अमरावती जिल्ह्यातील सकल बंजारा समाज आक्रमक; एसटी आरक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Amravati News : बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन छेडले असून समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गात सामावून न घेतल्यास मुंबईला धडक मोर्चा काढण्याचा आंदोलकांनी दिला इशारा

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: बंजारा समाजाला एसटी संवर्गातून आरक्षण मिळावे; यासाठी बंजारा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात आंदोलन सुरु करण्यात आले असून आज अमरावतीत सकल बंजारा समाजाच्या वतीने एसटी संवर्गाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने बंजारा बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

राज्यात मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसा जीआर काढण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर ओबीसी समाज व बंजारा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रामुख्याने बंजारा समाजाने एसटी संवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात आंदोलन सुरु केले आहे. त्यानुसार अमरावतीमध्ये मोर्चा काढण्यात आला. 

तीव्र आंदोलनाचा दिला इशारा 
"एकच मिशन – एसटी आरक्षण" अशा जोशपूर्ण घोषणा देत समाजबांधवांनी आपली ताकद दाखवली. मोर्चात महिला व युवकांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. हैदराबाद गॅझेट इतर जातींना जसं जाहीर केलं तसं बंजारा समाजाला सुद्धा जाहीर करा व आदिवासींचे आरक्षण आम्हाला मिळावे; अशी मागणी यावेळी बंजारा समाजाने केली. यावेळी नेत्यांनी समाजातील नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन एसटी आरक्षण तात्काळ लागू करण्याची मागणी केली. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला.

सोलापुरातही भव्य मोर्चा 

बंजारा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बंजारा समाज आक्रमक झाला असून सोलापुरात देखील मोर्चा काढण्यात आला. सोलापुरातील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापासून निघालेला मोर्चा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला जाऊन धडकणार आहे. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने पारंपारिक वेशभूषा धारण करून महिला वर्ग त्यासोबतच तरुणांचा समावेश आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Gold Rate : सुवर्णनगरीत सोन्याला लकाकी, प्रति तोळा १ लाख २४ हजारांच्या पार; आज किती रूपयांनी महागले गोल्ड?

Pimpri Chinchwad Police : शेतकऱ्यांच्या मदतीला सरसावले पिंपरी चिंचवड पोलीस; ४४ लाख रुपयाची मदत

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी! 'त्या' GR ला स्थगिती देण्यास नकार, कोर्टात नेमकं काय घडलं?

Virar News: माझ्या आईला न्याय द्या! चिमुरडीचं हृदयस्पर्शी आंदोलन|VIDEO

Maharashtra Live News Update : मराठा आरक्षण संदर्भात मोठी बातमी, GR ला स्थगिती देण्यास कोर्टाचा नकार

SCROLL FOR NEXT