argument between bacchu kadu and police Saam Tv
महाराष्ट्र

Amravati News: अमरावतीत हायव्होल्टेज ड्रामा; बच्चू कडू मैदानाच्या परवानगीवरून आक्रमक, पोलिसांशी बाचाबाची

Amravati Science Core Ground: अमरावतीमधील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ उद्या अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात अमित शहा यांची सभा होणार आहे. यावरून बच्चू कडू आक्रमक झाले आहेत.

Priya More

अमर घटारे, अमरावती

अमरावतीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सभेसाठी सायन्स कोर मैदानाच्या परवानगीवरून प्रहारचे नेते बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले आहेत. 'परवानगी आम्हाला, मग सभा अमित शहा यांची कशी?', असा थेट सवाल त्यांनी पोलिसांनाच केला. मैदानाच्या परवानगी प्रक्रियेवरून बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली.

अमरावतीतील महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी उद्या, बुधवारी सायन्सकोर मैदानावर भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची सभा होणार आहे. हे मैदान आम्ही आधीच आरक्षित केले होते, असे बच्चू कडूंकडून सांगण्यात आले. मैदान आरक्षित केले असताना अमित शहा यांच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली असल्याचा आरोपही बच्चू कडू यांनी केला. मैदानाच्या परवानगीच्या मुद्यावर आक्रमक होत कडूंनी गेटजवळच कार्यकर्त्यांना घेऊन ठिय्या मांडला.

मिळालेल्या माहितीनुसार, बच्चू कडू येणार म्हणून अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानाचे सर्व गेट पोलिसांनी बंद केले होते. मैदानावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सायन्स कोर मैदान बच्चू कडू यांनी 24 तारखेसाठी बुक करून त्याचे पैसे ही भरले होते. पण याच मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे. अमित शहा यांच्या सभेसाठी जय्यत तयारी सुरू आहे.

परवानगी आम्हाला मग सभा अमित शहा यांची कशी असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला. याच मैदानाची पाहणी करण्यासाठी बच्चू कडू स्वतः येत असल्याचे माहिती होताच पोलीसांनी सर्व गेट बंद केले. पोलिसांनी बच्चू कडू यांना गेटवरच थांबवले. अशामध्ये बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. 'पोलिस भाजप कार्यकर्त्यांसारखे वागत आहेत असे म्हणत अमित शहांनी कायदा तोडायला सांगितला का?', असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे.

यावेळी बच्चू कडू यांनी कायद्यापेक्षा माणसं मोठी नाहीत, असे म्हणत परवानगी आम्हाला मिळाली असल्याचे सांगितले. मैदानाच्या परवानगीवरून बच्चू कडू आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी सायन्स कोर मैदानाच्या गेटवरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यावेळी पोलिसांनी बच्चू कडू यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण बच्चू कडू या मैदानाच्या परवानगीवर ठाम आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एका मिनिटात उमेदवार जाहीर करीन!सुनील शेळके यांचा भाजपला इशारा; राजकारणात खळबळ|VIDEO

Bhakri Tips: ज्वारीची भाकरी थंड झाल्यावर कडक होतेय? 'या' सोप्या टीप्सने भाकरी होईल अगदी कापसासारखी लुसलुशीत

Andheri Fire News: वर्सोवा गावातील दुकानाला भीषण आग, आगीत अनेक वस्तू जळून खाक

Mega Block: रविवारी गरज असेल तरच बाहेर पडा! लोकल प्रवास होणार खडतर; मध्य- हार्बरवर मेगाब्लॉक, कधी आणि कुठे?

Maharashtra Live News Update: वर्सोवा गावातील दुकानाला मोठी आग

SCROLL FOR NEXT