Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati News : कर्ज मंजुरीसाठी अपंगाचा आत्मदहनाचा प्रयत्न; आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

Amravati News : अमरावती जिल्ह्यातील अनेक अपंगांना स्वयंरोजगारासाठी राज्य शासनाच्या अपंग बिज भांडवल योजना (कर्ज योजना) अंतर्गत जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात कर्जाचे प्रस्ताव सादर केले होते

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: अमरावती जिल्ह्यातील अपंगांना कर्ज मंजूर करण्यासाठी उद्धट वागणूक देणाऱ्या आणि दिशाभूल करणारे बँक मॅनेजरवर त्वरीत कार्यवाही करावी. तसेच कर्ज मंजूर करण्यात यावे; यासाठी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथे सामुहिक आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीसांनी सर्वांना ताब्यात घेतले. 

अमरावती (Amravati) जिल्ह्यातील अनेक अपंगांना स्वयंरोजगारासाठी राज्य शासनाच्या अपंग बिज भांडवल योजना (कर्ज योजना) अंतर्गत जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात कर्जाचे प्रस्ताव सादर केले होते. हे प्रस्ताव संपूर्ण तपासणी करुन संबंधित बँकांना (Bank) मंजुरीसाठी पाठविण्यात आले. परंतु बँक मॅनेजरने अपंग आहे; म्हणून कर्ज प्रस्ताव मंजुरीस नकार दिला आणि उद्धट वागणूक दिली. सोबतच दिशाभुल केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

दरम्यान अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक देणाऱ्या बँक मॅनेजरवर कारवाई करून कर्जाचे प्रकरण मंजूर करण्यात यावे; यासाठी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. हे आंदोलन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमल्यानंतर पोलिसांनी सर्वाना ताब्यात घेतले आहे. यात दोन जण सापडले नसून त्यांचा शोध पोलीस घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT