Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Amravati News : पोलिसांची नजर चुकवत आरोपी फरार; जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी होता दाखल

Amravati News : अमरावती मध्यवर्ती कारागृहातील कैदीला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात वार्ड नंबर १६ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

Rajesh Sonwane

अमर घटारे 

अमरावती : जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला आरोपी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता. (Amravati) दरम्यान आज पहाटेच्या सुमारास हा कैदी पोलिसांची नजर चुकवून फरार झाला आहे. या घटनेने रुग्णालयात खळबळ उडाली असून (Police) पोलिसांकडून शोध सुरु करण्यात आला आहे. 

अमरावती मध्यवर्ती कारागृहातील कैदीला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात वार्ड नंबर १६ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हा आरोपी दाखल असलेल्या वार्डच्या बाहेर पोलीसांचा देखील पहारा होता. मात्र सदरचा आरोपी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णातून (Hospital) पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पहाटेच्या सुमारास फरार झाला आहे. सकाळी पोलिसांनी बेडवर पहिले असता आरोपी दिसून आला नाही. आरोपी फरार झाल्याची माहिती समजताच रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांकडून शोध सुरु 
आरोपी फरार झाल्याची माहिती समजताच संपूर्ण पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून आरोपीला शोधण्यासाठी पोलिस कामाला लागले आहेत. आजूबाजूच्या परिसरात सकाळी शोध घेतला मात्र आरोपी आढळून आला नाही. यामुळे आरोपी कोठे जाऊ शकतो याचा शोध घेत याचा तपस करत शोध सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

औषधं घेऊच नका! पावसाळ्यात उच्च रक्तदाब कंट्रोलमध्ये आणण्यासाठी प्या हे मॅजिक ड्रिंक

Maharashtra News Live Update: कोल्हापूरहून रत्नागिरीकडे टायर घेऊन जाणाऱ्या टेम्पोला भीषण आग

Cholesterol control: शरीरात शांतपणे वाढतंय वाईट कोलेस्ट्रॉल; आजच बदला या ७ सवयी, नाहीतर वाढेल हार्ट अटॅकचा धोका

Political News : मोठी बातमी! मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा बदल, बडे नेते राजीनामा देणार

Shraddha Kapoor - Eetha : तैयार हो, आ रही है 'ईठा'; श्रद्धा कपूरची ठसकेबाज लावणी पाहून प्रेक्षकांची विकेट पडली, चित्रपटात मराठी अभिनेत्याची वर्णी|VIDEO

SCROLL FOR NEXT