Amravati Farmer Saam tv
महाराष्ट्र

Amravati Farmer : शेतकऱ्यापुढील संकट संपेना; अमरावती जिल्ह्यात महिनाभरात १९ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले

Amravati News : निसर्गाच्या लागरीपणामुळे शेतकरी हतबल होत असून पिकविलेल्या मालाला देखील चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरीसमोर आर्थिक संकट उभे राहते. यामुळे शेतीसाठी काढलेले कर्ज फेड करता येणे शक्य होत नाही.

Rajesh Sonwane

अमर घटारे 
अमरावती
: शेतकऱ्यासमोर एकामागून एक संकट उभेच राहत असते. त्यानुसार मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीने झालेले नुकसान यानंतर शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. याला कंटाळून आणि कर्जाच्या बोजाखाली असलेला शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असतो. अशाच प्रकारे अमरावती जिल्ह्यात मागील महिनाभरात तब्बल १९ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविल्याचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. 

शेतात राबराब राबून वर्षभरानंतर शेतीसाठी केलेला खर्च देखील काढणे शेतकऱ्याला आता कठीण जाऊ लागले आहे. कारण बळीराजासमोर एक संकट संपले कि दुसरे संकट उभे राहत असते. निसर्गाच्या लागरीपणामुळे शेतकरी हतबल होत असून पिकविलेल्या मालाला देखील चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी समोर आर्थिक संकट उभे राहत असते. यामुळे शेतीसाठी काढलेले कर्ज फेड करता येणे शक्य होत नाही. 

चार महिन्यात ६१ शेतकरी आत्महत्या 

अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. जिल्ह्यात मागील चार महिन्यात ६१ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली आहे. मागील वर्षी झालेली अतिवृष्टी, उत्पादन आलेली घट व कमी असलेला शेतमालाला बाजारभाव या सर्व परिस्थितीला कंटाळून अमरावती जिल्ह्यात मागील महिन्यात १९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव समोर आले आहे. आर्थिक गणित बिघडत असल्याने शेतकरी टोकाचा निर्णय घेत आहे. 

चारच शेतकरी कुटुंबाना मिळाले अर्थसहाय्य 

दरम्यान अमरावती जिल्ह्यात चार महिन्यात ६१ शेतकरी आत्महत्या झाल्या असून त्यात निकर्षानुसार ९ आत्महत्या पात्र ठरविण्यात आल्या आहेत. तर ४८ आत्महत्या अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित आहेत. यातील ९ पात्र आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबापैकी ४ कुटुंबांना अर्थसहाय्य देण्यात आल्याची माहिती आहे. तर ५ पात्र कुटुंब अद्यापही शासकिय मदतीपासून वंचित आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT