Amravati: खासदार नवनीत राणा आणि एसीपी पूनम पाटील यांच्यात बाचाबाची...(पहा व्हिडिओ) अरुण जोशी
महाराष्ट्र

Amravati: खासदार नवनीत राणा आणि एसीपी पूनम पाटील यांच्यात बाचाबाची...(पहा व्हिडिओ)

अमरावती जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

अरुण जोशी

अमरावती: अमरावती शहरातील राजापेठ मुद्दाम पुलावर आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा बिना परवानगी बसवलेला पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj statue) मनपाने काढल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील (Amravati) राजकारण चांगलेच तापले आहे. पुतळा काढल्यानंतर महानगरपालिका आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर (Municipal Commissioner Dr Pravin Ashtikar) यांच्यावर राजापेठ उड्डाणपुलाखाली शाही फेक करण्यात आली.

पहा व्हिडिओ-

या प्रकरणी आमदार रवी राणा यांच्यासह अकरा कार्यकर्त्यांवर हत्येचा प्रयत्न करण्यात आल्यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. यातील पाच आरोपींना अटकही करण्यात आली. तर शनिवारी खासदार नवनीत राणा आणि पोलिसांत जोरदार बाचाबाची झाल्याचं पहायला मिळालं. संसदेचे कामकाज आटोपून काल खासदार नवनीत राणा तेव्हा अमरावती परत आल्या नंतर प्रथम त्यांनी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी दुपारी घडलेल्या घटनेची मनपा आयुक्तांनी रात्री उशिरा खोटी तक्रार केली, खोटी तक्रार आणि खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडून दबाव आणल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला.

महापलिका आयुक्तांसारख्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यावर शाई फेकल्यानंतर पोलीस यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणेमध्ये राणा दाम्पत्य व युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांविषयी रोष असल्याचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये खासदार राणा यांना जी वागणूक मिळाली त्यावरून दिसून आले. राजापेठ पोलीस ठाण्यात खासदार नवनीत राणा यांना त्यांच्या अटक असलेल्या कार्यकर्त्यांना भेटण्यास मनाई केली. तसेच पोलीस उपायुक्त यांना भेटण्यास कुणीही कार्यकर्ता किंवा पीए घेऊन जाऊ नये यावरून ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यासोबत वाद झाला.

खासदार नवनीत राणा जिल्हा रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दोन्ही किडन्या निकामी झाल्याने भरती असलेल्या विनोद येवतीकर या कार्यकर्त्याला भेटायला गेल्या. मात्र सुरुवातीला इथेही पोलिसांनी नियमांचे कारण पुढे करून त्यांना भेट नाकारली. त्यानंतर खासदार नवनीत राणा आणि सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाली.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : काँग्रेसच्या आंदोलनावर किरेन रिजिजू यांची टीका; म्हणाले, ‘काँग्रेस दिशाहीन’

Red Saree Designs For Women: महिलांसाठी लाल साड्यांच्या सुंदर डिझाईन्स, 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

SCROLL FOR NEXT