Amravati Accident Saam tv
महाराष्ट्र

Amravati Accident : अपघाताचा थरार, भरधाव कारने चौघांना उडवलं; संतप्त लोकांनी कार फोडली, अमरावतीमधील घटना

Amravati Accident update : अमरावतीत सायंकाळच्या सुमारास अपघाताचा थरार पाहायला मिळाला. अमरावती शहरात भरधाव कारने चौघांना उडवल्याची घटना घडली.

Vishal Gangurde

अमरावतीमध्ये भरधाव कारने चौघांना उडवलं

अपघातानंतर परिसरातील नागरिक संतप्त, कारची केली तोडफोड

अपघातानंतर कार चालक तरुणीला मारहाण

अमर घटारे, साम टीव्ही

रायगडमध्ये ताम्हिणी घाटातील अपघाताची घटना ताजी असताना अमरावतीतही भीषण अपघात झाला आहे. अमरावती शहरात भरधाव कारने चौघांना उडवल्याची घटना समोर आली आहे. अमरावतीच्या मोतीनगरमध्ये हा अपघात घडला. या अपघातानंतर संपप्त लोकांनी कारची तोडफोड केली. कार चालवणाऱ्या तरुणीलाही लोकांनी चोपलं.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातील मोतीनगर चौकात सकाळी सुसाट वेगाने येणाऱ्या कारने चार लोकांना जोरदार धडक दिली. कार सुसाट वेगाने येत असताना मोतीनगर चौकात अचानक एकच खळबळ उडाली. तरुणीचे कारवरील नियंत्रण सुटून कारने रस्त्याने जाणाऱ्या दुचाकीस्वार आणि हातगाडी चालकाला धडक दिली.न

भरधाव कार समोर येत असल्याचे पाहताच अनेक जण जीव मुठीत घेऊन रस्त्याच्या कडेला पळाले. या अपघातानंतर संतप्त जमावाने दगड आणि लाथा बुक्क्याच्या साहाय्याने कारचे दरवाजे आणि कार फोडून टाकली. या अपघातात दोन दुचाकींचं नुकसान झालं आहे, तर कार चालक तरुणीला काही महिलांनी मारहाण केली. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. या अपघात प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी तत्काळ धाव घेऊन चारचाकी वाहनासह त्या चालक तरुणीला ताब्यात घेतले.

रायगडमध्ये कार नदीत कोसळली

रायगड ताम्हिणी अपघात झाला आहे. ही कार १२०० फूट दरीत कोसळली. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सर्व मृत तरुण पुण्यातील रहिवाशी असल्याची माहिती मिळत आहे. सर्व तरुण फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते, अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे. त्यातील काही जण बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अल्पवयीन मुलगी अत्याचार करून खून प्रकरण; युवा स्वाभिमान संघटनेच्या वतीने घटनेचा तीव्र निषेध

ठाकरेसेनेचा 72 जागांचा प्रस्ताव मनसे स्वीकारणार? 36 विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 2 जागा?

Employment : राज्य सरकारचा मास्टरस्ट्रोक; तब्बल ८००० विद्यार्थ्यांच्या नोकरीचा प्रश्न सुटणार, कुणाला होणार थेट फायदा?

शिंदेंची खळखळ, शाहांचं चव्हाणांनाच बळ? भाजपचं ऑपरेशन लोटस सुरूच राहणार?

Winter Health Care: थंडीच्या दिवसात आईस्क्रीम खावे की नाही?

SCROLL FOR NEXT