Earthquake  Saam Tv News
महाराष्ट्र

Earthquake : अमरावतीमध्ये भूकंपाचे लागोपाठ २ धक्के, घरांतील भांडी पडली, नाल्याला भेगा

Amravati Earthquake : अमरावतीमध्ये सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास शिरजगाव मोझरी गावात दोन सौम्य धक्के जाणवले. जीवितहानी झालेली नाही. काही घरातील भांडी पडली, तसेच एका नाल्याला भेगा पडल्या.

Namdeo Kumbhar

  • अमरावती जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

  • शिरजगाव, मोझरीत भूकंपामुळे भीतीचे वातावरण

  • भूकंपामुळे घरातील भांडी खाली, नाल्याला भेगा

  • स्थानिक प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा

  • शिरजगावात यापूर्वीही भूकंपाचे धक्के

Amravati Earthquake Alert: अमरावती जिल्ह्याला आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. तिवसा तालुक्यातील शिरजगाव, मोझरी गावात आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे दोन सौम्य धक्के बसले. भूकंपाचे धक्का जाणवल्यानंतर ग्रामस्थांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले. या भूकंपामुळे गावातील अनेक घरांतील भांडी खाली पडली, तर एका ठिकाणी नाल्याला भेगा पडल्याची माहिती स्थानिकांनी दिली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी अचानक जमिनीखालील कंपनामुळे अमरावतीमधील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. भूकंपाचे धक्के जाणवताच अनेकजण घराबाहेर पडले. स्थानिकांनी सांगितले की, काही सेकंदासाठी भूकंपाचे धक्के जाणवले. घरातील भांडी पडून खळखळाट झाला. गावातील एका नाल्याला भेगा पडल्या आहेत, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. स्थानिक प्रशासनाने या घटनेची माहिती घेतली असून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.

अमरावतीमधील शिरजगाव मोझरी गावात काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. यामुळे या परिसरात भूकंपप्रवण क्षेत्राची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, असे सौम्य धक्के भूकंपप्रवण क्षेत्रात सामान्य असतात. पण त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. भूकंपमापन केंद्राकडून या धक्क्यांची तीव्रता आणि कारणांचा तपास सुरू आहे. अमरावतीच्या स्थानिक प्रशासनाने गावकऱ्यांना शांत राहण्याचे आणि न घाबरण्याचे आवाहन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Bengal Files OTT Release : थिएटरनंतर पल्लवी जोशीचा 'द बंगाल फाइल्स' ओटीटीवर कधी येणार? वाचा अपडेट

Maharashtra Live News Update: अन्यथा दसरा मेळाव्याला मोठा निर्णय घ्यावा लागेल- मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

Jamner Accident : भरधाव डंपरने तरुणाला चिरडले; संतप्त ग्रामस्थांचा मृतदेहासह रास्ता रोको

Ashwini Kedari: PSI मध्ये मुलींमध्ये पहिली, IAS होण्याचं स्वप्न पण अश्विनी केदारींवर काळाचा घाला, अवघ्या ३०व्या वर्षी मृत्यू

सचिन तेंडुलकर बीसीसीआयचा अध्यक्ष होणार? कारणही आले समोर आले

SCROLL FOR NEXT