Amravati Crime Saam Tv
महाराष्ट्र

Crime: अमरावती हादरले! बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला, भरचौकात धारदार शस्त्राने वार करत तरुणाला जागीच संपवलं

Amravati Crime: अमरावतीमध्ये तरुणाची भरचौकात धारदार शस्त्राने सपासप वार करत हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली.

Priya More
  • अमरावतीमध्ये तरुणाची निर्घृण हत्या

  • धारदार शस्त्राने वार करत जागीच संपवलं

  • जय सियाराम नगर परिसरात घडली घटना

  • प्रज्वल खरे या २६ वर्षीय असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते

अमर घटारे, अमरावती

अमरावतीमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. बहिणीची छेड का काढली? असा जाब विचारल्यामुळे तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्याकांडाच्या या घटनेमुळे अमरावती हादरले आहे. पोलिसांनी या प्रकरणी ७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली तर इतर ५ आरोपी फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या जय सियाराम नगर परिसरात ही घटना घडली. प्रज्वल खरे (२६ वर्षे) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव होते. बहिणीच्या छेडछाडीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या प्रज्वल खरेची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत २ संशयित आरोपींना अटक केली. यामध्ये सात आरोपी होते तर पाच जण फरार आहेत.

आपल्या बहिणीचे AI मार्फत अश्लील व्हिडिओ आरोपीने बनवले होते. या संदर्भात आरोपीला जाब विचारण्यासाठी प्रज्वल गेला होता. मात्र त्याची हत्या करण्यात आली. भरचौकात प्रज्वलवर सात जणांनी धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तेजसने जागीच प्राण सोडले. मुख्य हल्लेखोरांचा शोध सुरू असून या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP ला आणखी एक मोठा धक्का; ऐन निवडणुकीआधी बडा नेता सोडणार पक्षाची साथ

Nushrratt Bharuccha: लोकांचे रानटी विचार...; RCB जिंकल्यानंतर नुसरत भरुचा ट्रोल, 'त्या' आवाजाबाबत अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींना आणखी एक तगडा झटका; नीकटवर्तीय नेत्यानं दिला महापौरपदाचा राजीनामा

Shukra Gochar: सावधान! पाच राशींसाठी पुढील दिवस धोक्याचे; शुक्राच्या गोचरमुळे आयुष्यात येतील अडचणी

Maharashtra News Live Update: राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणांचे प्रयत्न? मुख्यमंत्री भेटीमुळे चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT