Amravati Crime  Saam TV
महाराष्ट्र

अमरावतीतील भयंकर घटना! अल्पवयीन मुलीला पेढ्यातून गुंगीचं औषध दिलं; त्यानंतर...

अमरावतीमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमरावती : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. महिला अत्याचाराविरोधात कठोर पाऊलं उचलावीत अशी मागणी नागरिक करत आहेत. अशातच अमरावतीमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमरावतीत अल्पवयीन मुली तसेच महिला अद्यापही सुरक्षित नसल्याचं, पुन्हा एकदा पुढे आलं आहे. (Amravati Crime News)

अमरावती जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीला चक्क पेढ्यातून गुंगीच औषध देऊन, तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडिता तिच्या मामाच्या गावाला असताना आरोपीने तिला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर १२ जूनच्या रात्रीला तिला गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर आरोपींनी चारचाकीमध्ये पीडितेच्या अब्रुचे लचके तोडले.

दरम्यान, या घटनेनं पीडित मुलगी प्रचंड घाबरली. भेदरलेल्या परिस्थितीत तिने परतवाडा पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात अपहरण, सामूहिक अत्याचार आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच दोन नराधमांना अटक देखील करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami 2025: नागपंचमीला शिवलिंगावर या ३ गोष्टी अर्पण केल्याने दूर होतात संकटं

Dhadgaon News : अंगणवाडी मदतनीस पदावर नियुक्त महिलेला मारहाण; नंदुरबार जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Coconut Water: नारळ पाणी प्यायल्यानंतर 'या' गोष्टी खाणं टाळा, नाहीतर...

DIY Homemade Rakhi : घरीच बनवा या सुंदर राखी डिझाईन्स, रक्षाबंधनाचा सण होईल खास

Train Accident : १०० प्रवाशांना घेऊन जाणारी ट्रेन रुळावरून घसरली

SCROLL FOR NEXT