Amravati News  Saam Tv
महाराष्ट्र

Amravati News : घरची कोंबडी कुत्र्यानं खाल्ली; रागाच्या भरात ६ जणांना चिरडलं; अमरावतीतील घटनेचं धक्कादायक कारण आलं समोर

Amravati News : अमरावतीत एकाच कुटुंबांतील सहा सदस्यांना चारचाकी वाहनाने उडवून तिघांची हत्या केल्याने खळबळ उडाली होती. घटनेचं धक्कादायक कारण देखील समोर आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

समीर घटारे

Amravati News :

अंगणात बसलेल्या सहा जणांना कारने चिरडल्याची घटना अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील नाचोना गावात घडली होती. या घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचं धक्कादायक कारण देखील समोर आलं आहे. (Maharashtra News)

अमरावतीत एकाच कुटुंबांतील सहा सदस्यांना चारचाकी वाहनाने उडवून तिघांची हत्या केल्याने खळबळ उडाली होती. अंभोरे कुंटुबियांच्या कुत्र्यांने शेजाऱ्यांची कोंबडी खाल्ली होती. कोंबडी कुत्र्यांने खाल्ल्याचा राग आरोपीला होता. या रागाच्या भरात त्याने अंभोरे कुटुंबातील सदस्यांच्या अंगावर थेट कार चढवली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत अनुसया अंभोरे (वय 67), शामराव अंभोरे (वय 70) आणि अनारकली गुजर (वय 43) यांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Amravati News)

घटनेतील बचावलेल्या महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सर्वजण रस्त्यावर उभे होते. त्यावेळी संशयित आरोपीने कार त्यांच्या अंगावर घातली. जाणूनबुजून त्याने कार आमच्या अंगावर आणत होता. आम्हाला पळून जाण्याचे त्याने संधी दिली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिपक केसरकर यांनी बोलून दाखवली पुन्हा मंत्री होण्याची इच्छा

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, पोलिसांच्या पथकावर अंदाधुंद गोळीबार; एक जवान शहीद

आमचा वेळ वाया घालवू नका; विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात दाखल याचिकेवर सरन्यायाधीशांची टिप्पणी

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्यात ₹3000 ची वाढ होणार? कृषिमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर देत सगळंच सांगितलं

Amravati Tourism: अमरावतीमधील हा किल्ला देतो इतिहासाची साक्ष; एका सुट्टी नक्की फिरून या

SCROLL FOR NEXT