अमरावती: कोरोना विषाणूच्या (Coronavirus Second Wave) पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. भारतातील सर्वाधिक कोरोनाबाधित राज्य म्हणून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर होता. मागील दीड वर्षांपासून राज्यात कोरोना विषाणूनं थैमानघातलं आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रासाठी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे.
अमरावती जिल्हा आज पूर्ण पणे कोरोना मुक्त झाला आहे. शनिवारी झालेल्या चाचणीमध्ये एक ही रुग्ण कोरोना बाधित आढळून आलेला नाही त्यामुळे आरोग्य यंत्रणेत आज आनंदाचे वातवरण पाहायला मिळाले. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सांगितलं की, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे जिल्ह्याला कोरोना मुक्त करणं शक्य झालं आहे. याशिवाय त्यांनी ट्रेसिंग, चाचण्या आणि उपचाराबाबत आखलेल्या रणनीतीचाही उल्लेख केला आहे. bY
खरंतर, गेल्या वर्षी 2 एप्रिल रोजी अमरावती शहरातील हैदरपूरा भागात कोविडचा पहिला रुग्ण आढळला होता. आजपर्यंत अमरावती जिल्ह्यात एकूण ९६ हजार ८५ इतके रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. तर १५६३ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. तर ९४ हजार ४४७ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. अमरावती जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९८.३० इतका असून मृत्यू दर हा १.६३ इतका आहे.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.