Amravati Saam Tv
महाराष्ट्र

अमरावतीत सण-उत्सवांवर निर्बंध, मिरवणूक, शोभायात्रेत आक्षेपार्ह्य कृत्य, घोषणाबाजीला मनाई

सणांवर अमरावती शहर पोलिसांनी काही निर्बंध घातले आहेत.

अरुण जोशी

अमरावती: अमरावती शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी गुढीपाडवा, डॉ.आंबेडकर जयंती, रामनवमी, रमझान ईद, महावीर जयंती, हनुमान जयंती या सणांवर अमरावती शहर पोलिसांनी काही निर्बंध घातले आहेत (Amravati city police has imposed some restrictions on the celebration of festivals).

एप्रिल महिन्यातील सर्व सण उत्सवात परवानगी देण्यात आली. मात्र, हे सण कोरोना नियम पाळून साजरे करावे लागणार आहेत. सोबतच मिरवणूक, यात्रा यामध्ये कोणतेही आक्षेपार्ह्य कृत्य आणि घोषणाबाजीसही मनाई करण्यात आली आहे.

कोरोना संपल्याने यावर्षी धुमधडाक्यात सण उत्सव अमरावतीच्या जनतेला साजरे करायचे आहेत. मात्र, सर्व शोभायात्रा, विविध धार्मिक कार्यक्रमाची परवानगी घेणे आवश्यक राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

हे सण साजरे करताना धार्मिक कार्यक्रमात मिरवणुकीत आक्षेपार्ह्य घोषणाबाजी, बॅनर लावणे तसेच जातीय सलोखा भंग होणार नाही याची काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भुजबळ-वडेट्टीवार यांच्यातच वाद होत असतील तर ओबीसींनी कुणाकडे पाहायचं - नवनाथ वाघमारे

Diwali Car Offers: दिवाळी बंपर ऑफर; 'या' टॉप सेडान कारवर तब्बल २.२५ लाखांची सूट

Dog Attack : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाचा मुलावर हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Abhyang Snan Time: दिवाळी पहाटच्या दिवशी 'अभ्यंगस्नान' कधी करावे? वाचा शुभ मूहूर्त

Diwali 2025 : आली दिवाळी! फटाके फोडताना 'ही' घ्या काळजी, नाहीतर...

SCROLL FOR NEXT