Amol Mitkari  saam tv
महाराष्ट्र

Amol Mitkari : अमोल मिटकरींना खासदार व्हावसं वाटतंय, जाहीररित्या व्यक्त केली इच्छा; लवकरच पुढची दिशा ठरवणार

Amol Mitkari : अमोल मिटकरी यांनी अकोल्यातून लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच यासाठी पुढील दिशा लवकरच ठरवणार असल्याचे देखील म्हटले आहे.

Chandrakant Jagtap

Amol Mitkari: राष्ट्रवादीचे आमदार अमोल यांनी खासदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी एक ट्विट करून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. पक्षाने संधी दिल्यास भाजपविरुद्ध अकोला लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असे मिटकरी यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

अमोल मिटकरी राज्य सरकार आणि भाजपसह शिवसेनेवर टीका करत असतात. अनेकदा त्यांनी पत्रकारांना दिलेल्या उत्तरातून तर कधी सोशल मीडियातून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. आता त्यांनी अकोल्यातून लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच यासाठी पुढील दिशा लवकरच ठरवणार असल्याचे देखील म्हटले आहे.

अमोल मिटकरी म्हणाले "माझ्या पक्षाने संधी दिल्यास भाजप विरुद्ध अकोला लोकसभा मतदारसंघ मी लढवणार ! सध्या अकोला जिल्हा भ्रष्टाचार ग्रस्त व भाजपच्या मस्तीखोर राजकारणाने त्रस्त झाला आहे. या विरुद्ध मी लढायला तयार आहे. लवकरच पवार साहेबांची भेट घेऊन पुढची दिशा ठरवणार. भाजपला चोपायची ही संधी मला सोडायची नाही" (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे भीषण कार अपघातात निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Tumor warning signs: शरीरात ही ७ लक्षणं दिसली तर समजा कॅन्सरचा ट्यूमर होतोय तयार

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! जुलैपासून लागू होणार 'लँड टायटलिंग ॲक्ट'; आता प्रत्येक फ्लॅटचे मिळणार 'मालमत्ता कार्ड'

Ladki Bahin Yojana: मे महिन्याची १० तारीख उजाडली! लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० की ४५०० रुपये येणार? पाहा सविस्तर अपडेट

SCROLL FOR NEXT