Amol Mitkari Saam TV
महाराष्ट्र

Amol Mitkari News: दादांवर काय बोलता, त्यांनी तुम्हाला कामाला लावलं...; अमोल मिटकरींची कोल्हेंवर टीका

Amol Mitkari On Amol Kolhe: अमोल कोल्हेंनी यावेळी घेतलेल्या सभेमध्ये नाव न घेता अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्यावरून अमोल मिटकरी म्हणाले की, "सर्कशीतला वाघ आणि जंगलातला वाघ कोण आहे?

Ruchika Jadhav

Amol Mitkari Vs Amol Kolhe:

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू असल्याचं दिसतंय. अशात दादांनी तुम्हाला कामाला लावलं आहे. त्यामुळे दादांना बोलताना थोडं सबुरीने घ्या, असं म्हणत आमदार अमोल मिटकरी यांनी डॉ.अमोल कोल्हेंना टोला लगावला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा काढला आहे. या मोर्चाला शिवनेरी येथून बुधवारी ( २७ डिसेंबर ) सुरूवात झाली. यावेळी अमोल कोल्हेंनी राज्य सरकारसह उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीकास्र सोडलं. त्यांच्या टीकेला आता अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

अमोल कोल्हेंनी यावेळी घेतलेल्या सभेमध्ये नाव न घेता अजित पवारांवर निशाणा साधला होता. त्यावरून अमोल मिटकरी म्हणाले की, "सर्कशीतला वाघ आणि जंगलातला वाघ कोण आहे? हे बारामतीकरांना माहित आहे. आपण चार वर्ष शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रकट झाला नाहीत. कोल्हे साहेबांना आणि सुप्रिया सुळे यांना जर संघर्ष यात्रा काढावी लागत असेल आणि लोकसभेच्या तोंडावर इतकं पळ पळ पाळाव लागत असेल, तर हेच दादाचं वेगळं पण आहे."

तसेच अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर टीका करताना थोडं सबुरीने घेतलं पाहिजे, असा इशाराही अमोल मिटकरींनी यावेळी दिला आहे.

अमोल कोल्हे काय म्हणाले होते?

वाघ जेव्हा जंगलात असतो तेव्हा राजा वाटतो. हाच वाघ जेव्हा पिंजऱ्यात असतो तेव्हा केवळ गुरगुरांव लागतं. जेव्हा सर्कशीत तोच वाघ रिंगमास्टरच्या इशा-यावर कसरती करतो, तेव्हा काळजाला घरे पडतात, की ज्या वाघावर प्रेम केलं त्याला आज रिंगमास्टरच्या इशा-यावर चालाव लागतं. जेव्हा हाच वाघ पिंज-यात बघायला मिळतो.", अशा शब्दांत अमोल मिटकरींनी नामोल्लेख टाळून समाचार घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

SCROLL FOR NEXT