Amit Shah Maharashtra largest multilingual state statement saam tv
महाराष्ट्र

महाराष्ट्र सर्वात मोठं बहुभाषिक राज्य, शाहांच्या विधानावरून वाद पेटला

Amit Shah’s Maharashtra Multilingual Remark: महाराष्ट्र बहुभाषिक आहे की एकभाषिक ? असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? तुम्हाला आतापर्यंत जे वाटत आलंय तसं नाहीये....असं आम्ही नव्हे तर देशाचे गृहमंत्री अमित शाह म्हणतायत...ते नेमकं काय म्हटले आणि त्यावर कसा वाद पेटलाय? पाहूयात हा विशेष रिपोर्ट.........

Snehil Shivaji

महाराष्ट्रात माय मराठीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय वणवा पेटलाय. आजवर मराठी भाषेचा अनादर करणाऱ्यांविरोधात मराठी माणसाचा संताप उसळलेला आपण अनेकदा पाहिलाय... पण आता थेट देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनीच नवी मुंबईत हिंदी भाषा दिनाच्या कार्यक्रमात येऊन महाराष्ट्र हे देशातलं सर्वात मोठं बहुभाषिक राज्य असल्याचं विधान केलं. महाराष्ट्रात मोठ्या संख्येनं बहुभाषिक राहत असले तरी महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे. मात्र अमित शाहांच्या विधानामुळे महाराष्ट्र मराठी की बहुभाषिक? असा नवा वाद उफाळून आलाय. त्यामुळे विरोधकांनी अमित शाहांवर जोरदार टीका केलीय.

अमित शाहांच्या या विधानानंतर ठाकरेंच्या शिवसेनेने तर आक्रमक पवित्रा घेतलाच... पण मनसे प्रमुख राज ठाकरेंनीही "कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते असं म्हणत या वक्तव्याची खिल्ली उडवली. मराठीच्या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर अमित शाहांच्या बचावासाठी मुख्यमंत्र्यांनी बहुभाषिक राज्य म्हणजे ज्यांना बहुभाषा येतात ते असा युक्तिवाद केलाय. मात्र महाराष्ट्राला हिंदी भाषिक करण्याचा भाजपचा मोठा डाव असल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीनं केलाय.

आता मराठी भाषेवरुन राजकारणाला सुरुवात झालीये. परंतू देशात

देशात 1 नोव्हेंबर 1956 ला भाषावार राज्यांची पुनर्रचना

मात्र महाराष्ट्र आणि गुजरात मिळून द्विभाषिक राज्याची स्थापना

संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि महागुजरात आंदोलनाद्वारे भाषावार राज्यांची मागणी

बॉम्बे रिऑर्गनायझेशन अॅक्ट 1960 नुसार द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन

मराठीजनांचा महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांच्या गुजरातची 1 मे 1960 रोजी स्थापना

1 नोव्हेंबर 1956 ला भाषावार राज्यांची पुनर्रचना झाली. मुंबईचा प्रश्न गुंतागुंतीचा होता म्हणून द्विभाषिक मुंबई राज्य तयार करण्यात आलं. मात्र मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि महागुजरात आंदोलन उभं राहिल्यानंतर Bombay Reorganisation Act, 1960 तयार कऱण्यात आला आणि १ मे १९६० रोजी द्विभाषिक मुंबई राज्याचे विभाजन झालं आणि मराठीजनांचा महाराष्ट्र आणि गुजराती भाषिकांचा गुजरातची 1 मे रोजी स्थापना झाली. १०५ हुतात्म्यांचे रक्त सांडल्यानंतर मुंबईसह मराठी भाषिकांचा महाराष्ट्राचा मंगलकलश यशवंतराव चव्हाणांनी आणला. गेल्या ६५ वर्षांपासून मराठी हीच महाराष्ट्राची राज भाषा असताना आता अचानक महाराष्ट्राला बहुभाषिक प्रदेश म्हणून दिल्लीश्वरांना नेमकं काय साध्य करायचंय? विशेष म्हणजे हिंदी दिनाच्या कार्यक्रमात शाहांनी हे विधान करून नेमकं कुणाला खुश करण्याचा प्रयत्न केलाय? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Fire: मारवाडी गल्लीतील फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहनही आगीच्या विळख्यात; दोन जणांचा मृत्यू

Tuesday Horoscope: मन प्रसन्न राहील! ५ राशींच्या व्यक्तींचा दिवस आनंदात जाईल; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

SCROLL FOR NEXT