Amit Deshmukh To CM Eknath Shinde  Saam Tv
महाराष्ट्र

Amit Deshmukh: सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा, अमित देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Amit Deshmukh To CM Eknath Shinde : अमित देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी केली आहे.

Satish Kengar

राज्यात भाजप आणि शिंदे गटाच्या काही नेत्यांकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य होताना दिसत आहे. यावरच राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार अमित देशमुख यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देशमुख यांनी प्रक्षोभक वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांचं निषेध करत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. देशमुख यांनी आपल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही उल्लेख केला आहे.

गांधी जयंतीचे निमित्त साधून देशमुख यांनी हे पत्र मुख्यमंत्री शिंदे यांना लिहिले असून ते 'एक्स'वर शेअर केले आहे. त्यांनी आपल्या पत्रात राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवले आहे. उज्वल परंपरा जपणाऱ्या महाराष्ट्रात सध्या काही राजकीय तसेच काही धार्मिक नेत्यांची सावर्जनिक वक्तव्ये ही दुसऱ्या धर्माचा आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचा अवमान करणारी आहेत. त्यांच्या अशा भडकावू आणि विद्वेषक वक्तव्यांमुळे वर्षानुवर्षे एकोप्यात सांधलेली आपल्या महाराष्ट्रातील नागरिकांची मने दुंभगण्याची भीती निर्माण झाली आहे. गोष्टी तोडायला फार कष्ट पडत नाहीत. मात्र तुटलेल्या गोष्टी जोडायला प्रचंड कष्ट पडतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

अमित देशमुख यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटलं की, महात्मा गांधी यांनी आपलं उभं आयुष्य अंहिसा, सत्य, सेवा या मूल्यांसाठी वेचलं. त्यांनी याच मुल्यांच्या जोरावर भारतीय स्वातंत्र्याचा लढा उभारला. त्यातून विविधतेमुळे एकमेकांपासून दुरावलेला आपला भारतीय समाज त्यांच्या नेतृत्त्वात ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात एकवटला आणि सर्व जातीधर्माच्या भारतीयांनी एकोप्याने स्वातंत्र्य लढा उभारुन देश स्वतंत्र केला.

स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षे आपला देश विविधतेमध्ये असलेली आपली एकता जपून आहे. त्याचं मूळ गांधीजींच्या विचारात आहे. अहिंसा, सत्य, सेवा ही मूल्यं देशात आजवर झालेल्या सर्वच केंद्र आणि राज्य शासनांनी आपली आदर्श मूल्य म्हणून जपली. त्यामुळेच आज जगभरात भारत देश हा महात्मा गांधीजी यांच्या विचारांचा देश म्हणून ओळखला जातो. म्हणूनच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांच्या प्रत्येक विदेश दौऱ्यात महात्मा गांधीजी यांचे नाव आपल्या प्रत्येक भाषणात आवर्जुन घेतात.

...गोष्टी तोडायला कष्ट पडत नाहीत

उज्वल परंपरा जपणाऱ्या महाराष्ट्रात सध्या काही राजकीय तसेच काही धार्मिक नेत्यांची सार्वजनिक वक्तव्ये ही दुसऱ्या धर्माचा आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचा अवमान करणारी आहेत. त्यांच्या अशा भडकावू आणि विद्वेषक वक्तव्यांमुळे वर्षानुवर्षे एकोप्यात सांधलेली आपल्या महाराष्ट्रातील नागरिकांची मने दुंभगण्याची भीती निर्माण झाली आहे. गोष्टी तोडायला फार कष्ट पडत नाहीत. मात्र तुटलेल्या गोष्टी जोडायला प्रचंड कष्ट पडतात, असे ते पत्रात म्हणाले.

राज्यात सामाजिक, जातीय सलोखा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. तसेच प्रक्षोभक वक्तव्ये करणाऱ्या समाजविघातक व्यक्तींचा निषेध करत मुख्यमंत्री शिंदे हे अशा व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देतील, अशी अपेक्षा त्यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

SCROLL FOR NEXT