Amboli Ghat accident Saam tv
महाराष्ट्र

Amboli Ghat accident : आंबोली घाटात भयंकर अपघात, ट्रकच्या धडकेत दुचाकीचा चुराडा, बापाच्या डोळ्यासमोर लेकीचा मृत्यू

Amboli Ghat truck accident latest news : आंबोली घाटात भीषण अपघातात ११ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली असून, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

विनायक वंजारे | साम टीव्ही प्रतिनिधी

11 year old girl dies in road accident Amboli : आंबोली घाटात आज एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका आयशर ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत ११ वर्षीय चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. तर तिचे आई-वडील आणि बहीण जखमी झाले आहेत. या प्रकरणी ट्रक चालकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबोलीतील प्रसाद गोविंद राऊत हे आपल्या कुटुंबासह सुझुकी ॲक्सेस गाडीने आंबोलीकडून सावंतवाडीच्या दिशेने जात होते. दुचाकी नानापाणी परिसरातील एका वळणावर आली असता, मागून येणाऱ्या आयशर ट्रकने (क्र. GJ 03 BW 9027) त्यांना जोरदार धडक दिली.

या ट्रकमध्ये फरशा (टाईल्स) आणि मार्बलचा जड माल भरलेला होता. ट्रक चालक प्रकाश बिजलबाई टोयटा (वय २६, रा. राजकोट, गुजरात) याने वळणावर गाडीचा वेग कमी न करता निष्काळजीपणे वाहन चालवल्याने हा अपघात घडला. या भीषण धडकेत कुमारी निकिता प्रसाद राऊत (वय ११) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिची आई सुचिता राऊत, वडील प्रसाद राऊत आणि सहा वर्षांची बहीण निधी राऊत हे या अपघातात जखमी झाले आहेत. दुचाकीला धडक दिल्यानंतरही ट्रकचा वेग इतका प्रचंड होता की, चालक गाडीवर नियंत्रण मिळवू शकला नाही. घटनास्थळापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर एका वळणावर हा ट्रक बाजूच्या दगडावर आदळून पलटी झाला.

या अपघातामध्ये चालक प्रकाश टोयटा आणि क्लिनर विशाल टोयटा हे दोघेही जखमी झाले. अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच आंबोली पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, हवालदार संतोष गलोले, मनीष शिंदे, रामदास कदम, मुंडे, होमगार्ड भांडे आणि जंगले यांनी तातडीने मदतकार्य राबवून घाटातील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. आरोपी ट्रक चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मयत निकिता हिचे शवविच्छेदन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक चव्हाण करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युद्धभूमीवर शत्रूविरोधात AIचा वापर, तेहरानवरील हल्ल्यांमागे AI चा सल्ला

खासदार राहुल गांधींची काँग्रेसमधून हाकलपट्टी होणार? मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानं राजकारणात खळबळ

चर्चा फिस्कटली, संघर्ष अटळ, मध्य-पूर्वेत पुन्हा युद्ध पेटणार? जगात खळबळ

Maharashtra News Live Update: अशोक खरात प्रकरणी तपास करत असलेल्या SIT ची तिसऱ्यांदा जागा बदलली

लाभार्थी महिलेकडे शरीरसुखाची मागणी, e-KYC च्या नावाखाली महिलेचा छळ

SCROLL FOR NEXT