Former corporator Mahesh Gaikwad death threat  Saam Tv News
महाराष्ट्र

Mahesh Gaikwad : गणपत-वैभव गायकवाडांच्या नादी लागू नको, तुझा बाबा सिद्दीकी करु; माजी नगरसेवक महेश गायकवाडांना धमकी

Former Corporator Mahesh Gaikwad Threat to Kill : माजी नगरसेवक गायकवाड यांनी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहे.

Prashant Patil

ठाणे : गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड यांचे नाव घेऊ नको. नाहीतर तुझा बाबा सिद्दीकी करु, अशी धमकी एका पत्राद्वारे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांना देण्यात आली आहे. माजी नगरसेवक गायकवाड यांनी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहे.

माजी नगरसेवक महेश गायकवाड हे तीन दिवसापूर्वी अंबरनाथमध्ये एका लग्न सभारंभासाठी गेले होते. त्यावेळी एक तरुण त्यांच्याजवळ आला आणि त्याने एक लिफाफा त्यांच्या हातात दिला. अनेक लोकं समस्या घेऊन येतात. त्यामुळे समस्यांचे पत्र असेल असे समजून तो लिफाफा महेश गायकवाड यांनी घेतला. लिफाफा उघडून पाहिला तर त्यात गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड यांचे नाव घेऊ नको, नाहीतर तुझा बाबा सिद्धीकी करु असा मजकूर लिहिला होता. ज्या कागदावर ही धमकी दिली गेली आहे. तो कागद जेलमध्ये वापरला जात असल्याचा दावा महेश गायकवाड यांनी केला आहे.

२ फेब्रुवारी २०२४ रोजी एका जागेच्या वादातून हिललाईन पोलीस ठाण्यात भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार जखमी झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी माजी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह सहा जणांना अटक केली होती. त्यापैकी तीन जण जामीनावर सुटले आहेत. माजी आमदार गायकवाड यांचा जामीन अर्ज नुकताच कल्याण न्यायालयाने फेटाळला आहे. या गुन्ह्यात माजी आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड याचं नाव होतं. पोलिसांनी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करताना वैभव याचं नाव वगळलं आहे. या प्रकरणी महेश गायकवाड यांनी जोरदार आक्षेप घेतला होता. त्यानंतर महेश गायकवाड यांना जीवे ठार मारण्याची धमकी आली आहे. पत्र देणाऱ्या तरुणाचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी महेश गायकवाड यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT