Ambarnath News Saam tv
महाराष्ट्र

Ambarnath : चोरी करायला येताच रंगेहात पकडले; नागरिकांनी धु धु धुतले, चोरट्यांना दिले पोलिसांच्या ताब्यात

Ambarnath News : तीन चोरटे चोरी करण्यासाठी बंगल्यात घुसले होते. बंगल्याच्या खिडकीचे ग्रील तोडून त्यांनी आत प्रवेश केला. मात्र बंगल्यात असलेल्या वॉचमनच्या हा प्रकार लक्षात आल्यामुळे त्याने आरडाओरडा केला

अजय दुधाणे

अंबरनाथ : रात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करून चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र चोरटे बंगल्यात घुसल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी त्यांना रंगेहात पकडत चांगलाच चोप दिला. यानंतर पोलिसांना माहिती देत चोरट्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची घटना अंबरनाथ मधील हुतात्मा चौकात घडली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ समोर आला आहे.

अंबरनाथ पूर्वेच्या हुतात्मा चौकाजवळील शिवसृष्टी समोर असलेल्या एका बंगल्यात गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास हि घटना समोर आली आहे. यात तीन चोरटे चोरी करण्यासाठी बंगल्यात घुसले होते. बंगल्याच्या खिडकीचे ग्रील तोडून त्यांनी आत प्रवेश केला. मात्र बंगल्यात असलेल्या वॉचमनच्या हा प्रकार लक्षात आल्यामुळे त्याने आरडाओरडा केला. यावेळी रस्त्यावरून जाणारे लोक तिथे थांबले.  

दोघे सापडल्याने दिला चोप 

जमलेल्या नागरिकांना बंगल्यात चोर घुसल्याचे समजताच त्यांनी चोराला पकडण्यासाठी बंगल्यात धाव घेतली. यावेळी एक चोर तळमजल्यावर सापडला. तर दुसरा चोर गच्चीच्या दाराजवळ लपून बसलेला आढळून आला. या दोघांनाही जमावाने बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केलं. दरम्यान, तिसरा चोर तिथून पळून जाण्यात यशस्वी झाला होता.  

पोलिसांनी तिसऱ्या चोरट्यालाही घेतले ताब्यात 

पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तिसऱ्या चोरट्याचा शोध घेतला असता काही वेळातच पोलिसांनी त्याला देखील पकडून पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी या चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. नशा करण्यासाठी पैसे मिळावेत, या उद्देशाने हे चोरटे बंद बंगल्यांमध्ये चोऱ्या करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Bigg Boss 19'च्या घरामध्ये राडा; 5 सदस्य नॉमिनेट, कुणाचा पत्ता कट होणार?

Satara Gazetteer: मराठा आरक्षणात सातारा गॅझेटियरचं महत्त्व काय? पाहा सविस्तर | VIDEO

Maharashtra Live News Update: सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 170 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा

Viral Video: क्रूरता! कुत्रा भुंकला म्हणून दुचाकीला बांधलं अन् गावभर फरफटत नेलं, नाशिकमधील व्हिडीओ व्हायरल

Mumbai-Konkan Ro Ro Ferry: आनंदाची बातमी! मुंबई-कोकण प्रवास केवळ ५ तासांत होणार, सागरी रो-रो चाचणी यशस्वी

SCROLL FOR NEXT