Ambarnath Corporation Saam tv
महाराष्ट्र

Ambarnath Corporation : अंबरनाथमध्ये करवसूलीसाठी जप्तीची मोहीम; १२ कमर्शिल मालमत्तांना ठोकलं सील

Ambarnath News : थकबाकी वसूल करण्यासाठी अंबरनाथ पालिकेचे नवे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड हे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. आर्थिक वर्ष समाप्तीच्या अनुषंगाने हि मोहीम अधिक तीव्र करण्यात आली

अजय दुधाणे

अंबरनाथ : मार्च एंडिंग असल्याने पालिका, महापालिकेकडून थकीत कराची रक्कम वसुली केली जात आहे. त्यानुसार अंबरनाथमध्ये थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेने थेट जप्तीची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत अंबरनाथ शहरातील एक लाखापेक्षा जास्त कर थकीत असलेल्या मालमत्तांना सील ठोकण्यास पालिकेने सुरुवात केली असून १२ वाणिज्यिक मालमत्तांना सील लावण्यात आले आहे. 

अंबरनाथ पालिकेचा मालमत्ता कर हा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. मात्र अनेक करदाते त्यांचा कर नियमितपणे भरत नसल्याने पालिकेकडे थकबाकी जमा झाली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी अंबरनाथ पालिकेचे नवे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड हे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. आर्थिक वर्ष समाप्तीच्या अनुषंगाने हि मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून पुढील दहा- बारा दिवसात मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे. 

पहिल्याच दिवशी १२ मालमत्तांना सील 

पालिकेचे मुख्याधिकारी गायकवाड यांनी थेट एक लाखाच्या वर कर शिल्लक असलेल्या मालमत्तांना सील ठोकायला सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी १२ वाणिज्यिक मालमत्तांना त्यांनी सील ठोकलं असून येत्या काळात ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. यामुळे कर थकबाकीदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.  

३१ मार्चपूर्वी कर भरणा करण्याचे आवाहन

दरम्यान अंबरनाथकरांना चांगल्या सोयी सुविधा देता याव्यात यासाठी कर भरणे आवश्यक आहे. यासाठी ३१ मार्चपर्यंत ज्यांचा कर थकलेला असेल, त्यांनी कर भरणा करण्याचं आवाहन उमाकांत गायकवाड यांनी केलं आहे. अन्यथा बड्या थकबाकीदारांच्या मालमत्तांना सील लावण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! पाहा तुमच्या शहरातील २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रायगडमध्ये दाखल

Cardio Workout at Home: घरच्या घरी करा कार्डिओ वर्कआउट; फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी या ७ एक्सरसाइज बेस्ट

Goregaon Mulund Link Road: दिंडोशी कोर्ट ते फिल्मसिटी आता सुसाट जा, फ्लायओव्हर या दिवशी होणार सुरू; गोरेगाव मुलुंड लिंकरोडवर मोठी अपडेट

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी मेहनत करूनही फरक दिसत नाही? नकळत होणाऱ्या 'या' चुका पडू शकतात महागात

SCROLL FOR NEXT