Ambarnath News Saam tv
महाराष्ट्र

Ambarnath News : मतदान केल्यानंतर बॅलेट पेपरसह सेल्फी; पदवीधर निवडणुकीच्या मतदान दरम्यानचा प्रकार

Ambarnath News : निवडणुकीत बॅलेट बॉक्सच्या आत मोबाईल वापरण्यास किंवा फोटो व्हिडिओ काढण्यास मनाई असून आजवर असे प्रकार समोर आल्यानंतर त्यावर कठोर कारवाई करण्यात आली

अजय दुधाणे

अंबरनाथ : पदवीधर शिक्षक मतदार संघासाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. या मतदान दरम्यान मतदान केल्यानंतर बॅलेट पेपरसह सेल्फी काढून व्हायरल करण्याचा प्रकार अंबरनाथमध्ये समोर आला आहे. अंबरनाथमध्ये भाजपाच्या महिला शहराध्यक्षा सुजाता भोईर यांचा हा सेल्फी व्हायरल झाला आहे. 

निवडणुकीत (Election) बॅलेट बॉक्सच्या आत मोबाईल वापरण्यास किंवा फोटो व्हिडिओ काढण्यास मनाई असून आजवर असे प्रकार समोर आल्यानंतर त्यावर कठोर कारवाई करण्यात आली आहे. मात्र असं असतानाही भाजपाच्या अंबरनाथ महिला शहर अध्यक्षा सुजाता भोईर यांनी मतदान केंद्रात मोबाईल नेऊन मतदान केल्यानंतर बॅलेट पेपरसोबत सेल्फी काढला. यानंतर हा सेल्फी व्हॉटसअपच्या स्टेटसला ठेवला, तसंच फेसबुकवरही टाकला. 

कोकण पदवीधर निवडणुकीत मतदान केल्यानंतर बॅलेट पेपरसह सेल्फी घेऊन फेसबुक आणि व्हॉटसअप स्टेटसला ठेवल्याचा प्रकार समोर आला. (BJP) सुजाता भोईर यांनी व्हायरल केलेला फोटो काही वेळातच हा शहरात व्हायरल झाला. हा सेल्फी सध्या शहरात व्हायरल झाला असून याप्रकरणी सुजाता भोईर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याप्रकरणी सुजाता भोईर यांच्यावर आता प्रशासन आणि पोलिसांकडून काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Car Theft News : वाहन चालकांनो सावधान! फक्त ६० सेकंदात चोरली महागडी कार; व्हिडिओ पाहून विचारात पडाल

Maharashtra Live News Update: राज्यातील धरणांमधील आवक वाढली, रायगडातील 17 धरणं फुल्ल

Footballer Death : कार अपघातात प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Maharashtra Politics: संजय राऊत हे स्वतः 113 दिवस जेल भोगून आलेले आणि जामिनावर सुटलेले आरोपी आहेत- चित्रा वाघ|VIDEO

Kalyan : घरावरील झाड हटवायला वीज खंडीत करण्यासाठी पैशांची मागणी; महिलेचा महावितरण कर्मचाऱ्यावर आरोप

SCROLL FOR NEXT