MNS  Saam tv
महाराष्ट्र

MNS : अंबरनाथमध्ये मनसेचा बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये गोंधळ; अमराठी ब्रँच मॅनेजरला दिला इशारा

Ambarnath News : रिझर्व बँकेच्या नवीन गाईडलाईन्स प्रमाणे बँकेचे व्यवहार मराठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतचे पत्र मनसेकडून सर्व बँकांना देण्यासाठी आज अंबरनाथमध्ये मनसेचे पदाधिकारी जात आहे

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेमध्ये जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला आहे. बँकेचे अमराठी ब्रँच मॅनेजरने मराठी बोलण्यास नकार देत उलट उत्तरं दिल्याने संतापलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. यावेळी मराठीत बोलता येत नसेल, तर तुमच्या राज्यात निघून जाण्याचा इशारा ब्रँच मॅनेजरला देण्यात आला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मराठीचा मुद्दा मांडत बँका तसेच आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर होतो कि नाही, यावर मनसे आक्रमक झाली आहे. तसेच रिझर्व बँकेच्या नवीन गाईडलाईन्स प्रमाणे बँकेचे व्यवहार मराठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतचे पत्र मनसेकडून सर्व बँकांना देण्यासाठी आज अंबरनाथमध्ये शहराध्यक्ष कुणाल भोईर, शहर संघटक स्वप्निल बागुल आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव हे कार्यकर्त्यांसह गेले होते. 

बँक मॅनेजरला दिला थेट इशारा 

दरम्यान मनसेचे पदाधिकारी बँकेत गेले असताना अंबरनाथच्या बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शाखा व्यवस्थापकाकडे पत्र देण्यासाठी गेले होते. यावेळी बँकेचे शर्मा नामक अमराठी ब्रँच मॅनेजरने मराठी येत नसल्याचं सांगितले. यावरून मनसेचे पदाधिकारी अधिक आक्रमक होऊन मराठी येत नसल्यास तुमच्या राज्यात जाऊन काम करा, असा इशारा त्यांना दिला. 

तर मनसे स्टाईल आंदोलन 

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा देताच या ब्रँच मॅनेजरने आमच्या पुण्याच्या मुख्य शाखेला जाऊन सांगा, असं उत्तर दिले. यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांचा अधिक संताप झाल्याने मनसे पदाधिकाऱ्यांनी ब्रँच मॅनेजरच्या केबिनमध्ये गोंधळ घातला. तसंच बँकेचे व्यवहार मराठीत न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT