Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Fraud Case : कॅब चालकाकडून बनावट फोन पे द्वारे फसवणूक; पेट्रोल भरल्यानंतर प्रकार उघड

Ambarnath News : गॅस भरून झाल्यावर त्याने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करत पंपावरील कर्मचाऱ्यांना फोन पे ॲपचा स्क्रीन शॉट दाखवला

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये कॅब चालकाकडून बनावट फोन पे ॲपच्या माध्यमातून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सीएनजी पंपावर हा प्रकार लक्षात आला असून कॅब चालकाने पेटीएमचा क्यूआर कोड स्कॅन करून पैसे पाठवल्याचं पंपावरील कर्मचाऱ्यांना दाखवलं. मात्र हे पैसे पंप चालकाला न मिळाल्यामुळे त्याने चालकाला पकडून त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता ॲपच बनावट असल्याचं उघड झाले.

अंबरनाथच्या (Ambarnath) म्हाडा कॉलनी परिसरात महानगर गॅसचा सीएनजी पंप आहे. या पंपावर एक कॅब चालक गॅस भरण्यासाठी आला. गॅस भरून झाल्यावर त्याने पैसे ट्रान्सफर करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करत पंपावरील कर्मचाऱ्यांना फोन पे ॲपचा स्क्रीन शॉट दाखवला. ज्यात पैसे गेल्याचं दिसत होतं. याच चालकाने रविवारी देखील असाच प्रकार करून पंपावरील कर्मचाऱ्यांची फसवणूक केली होती. ही बाब पंपावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येईपर्यंत कॅब चालक इथून निघून गेला होता. अशा प्रकरणात कर्मचाऱ्यांना आपल्या खिशातून पैसे भरावे लागत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी (Fraud) या कॅबचा नंबर लक्षात ठेवला होता. 

दरम्यान आपली चोरी पकडली गेली नाही. या अविर्भावात असलेला कॅब चालक सोमवारी सायंकाळी पुन्हा गॅस भरण्यासाठी पंपावर आला. यावेळी त्याच्यावर नजर ठेवून असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याने क्यूआर कोड स्कॅन करताच पंपावरील मोबाईल चेक केला. मात्र त्यात पैसे आल्याची एन्ट्री दिसून न आल्यामुळे त्यांनी कॅब चालकाला पकडलं आणि पोलिसांना बोलावले. पोलिसांनी त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यामध्ये फोन पे चं ॲपच बनावट असल्याचं उघड झालं. यावेळी कॅब चालकाने आपली चूक मान्य करत ती फसवणूक कशी केली, हे दाखविले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी कॅब चालकाला ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेलं असून पुढील कारवाई सुरू करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT